‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त सहभागी झालेल्या मान्यवरांनी रामनाथी आश्रम पाहिल्यावर दिलेला अभिप्राय !
१. ‘हा आश्रम अतिशय सुंदर आहे.
२. हा आश्रम म्हणजे आध्यात्मिक चेतनेचा विस्तार असून सामान्य जनांसाठी कल्याणकारी आणि अडचणींचे निराकरण करणारे केंद्र आहे.
३. हा आश्रम म्हणजे समाजहितकारी स्थळ आहे.
४. ‘सूक्ष्म जगता’विषयीचे प्रदर्शन हे ज्ञानाचे भांडार आहे.
५. समाजाच्या कल्याणासाठी भारत आणि बाहेरील देश यांमध्ये या आश्रमाच्या महतीची वार्ता पोचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.’
– श्री. नोनी गोपाल, स्टेट प्रेसिडेंट, हिंदू सहायता समिती, बंगाल. (२८.५.२०१९)
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |