हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करा !

यवतमाळ येथे धरणे आंदोलन

यवतमाळ, १२ फेब्रुवारी (वार्ता.) –  पुणे येथील एल्गार परिषदेच्या सभेत हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करावी, यासाठी भाजप  उत्तर भारतीय जिल्हा मोर्चाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा, भाजप जिल्हा महामंत्री राजूभाऊ पडगीलवार यांनी केले. या वेळी संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.