भारताची राज्यघटना सिद्ध करतांना घटनाकारांनी वेद, मनुस्मृति यांचा अभ्यास न करणे
भारताची राज्यघटना सिद्ध करतांना घटनाकारांनी पाश्चिमात्य देशांच्या २०० ते ३०० वर्षे जुन्या राज्यघटनांचा अभ्यास केला; परंतु त्यापेक्षाही अधिक श्रम आणि अधिक वेळ देऊन प्राचीन भारतीय घटनात्मक व्यवस्थांचा अभ्यास करायला हवा होता. या अभ्यासासाठी वेद, मनुस्मृति, चाणक्यनीती, विदुरनीती इत्यादींचे जाणकार असलेल्या संस्कृततज्ञांचे साहाय्य घेणे आवश्यक होते. संस्कृत भाषेचे अज्ञान आणि अर्धवट ज्ञान यांमुळे काही लोक मनुस्मृति इत्यादी शास्त्रांचे तीव्र विरोधी होते. (संदर्भ : मासिक ‘गीता स्वाध्याय’, जानेवारी २०१३)