बोगस प्रमाणपत्र विकणार्या धर्मांधास अटक
|
मुंबई – विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांची खोटी प्रमाणपत्रे अन् गुणपत्रिका बनवून देणारा सत्तार कासीम अली शेख याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. तो ५ ते १५ सहस्र रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत असे. त्याच्याकडून बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. याविषयी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.