देहलीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !
|
|
नवी देहली – ३० ते ४० धर्मांधांच्या एका जमावाने १० फेब्रुवारीच्या रात्री देहलीतील मंगोलपुरी भागातील रिंकू शर्मा या बजरंग दलाच्या २६ वर्षीय कार्यकर्त्याच्या घरात घुसून पाठीत चाकू खुपसून हत्या केली. रिंकू शर्मा यांच्या कुटुंबियांनी, ‘५ ऑगस्ट या दिवशी श्रीराममंदिराविषयी काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी धर्मांधांसमवेत वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आली’, असा दावा केला. पोलिसांनी या प्रकरणी मेहताब, दानिश, जाहिद, ताजुद्दीन आणि इस्लाम या ५ जणांंना अटक केली असून अन्य आरोपी पसार आहेत. या हत्येनंतर रिंकू शर्मा यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. रिंकू शर्मा येथील बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते होते आणि ते येथे हनुमान चालिसाचे पठण करण्यासह हिंदुत्वाचे कार्य करत होते. ते एका रुग्णालयातील प्रयोगशाळेत काम करत होते. रिंकू शर्मा रहात त्या परिसरात मुसलमानांचे प्राबल्य आहे. (जेथे अल्पंसख्य बहुसंख्य असतात, तेथे हिंदूंचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न होतो, हे पुनःपुन्हा सिद्ध होते ! – संपादक) घटनेची माहिती मिळताच मंगोलपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता.
‘The mob that killed Rinku Sharma included women too, they pushed the knife deeper into his back to kill him’: Bajrang Dal leaderhttps://t.co/tCU4QU5qwO
— OpIndia.com (@OpIndia_com) February 12, 2021
किरकोळ वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारे देहलीचे ‘सहिष्णु’ पोलीस ! हिंदुद्वेषातून ही हत्या झाली असतांना पोलीस जाणीपूर्वक सत्य लपवण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
पोलिसांनी या हत्येमागे धार्मिक कारण असल्याच्या आरोपाला अद्याप दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी, ‘रिंकू शर्मा त्यांच्या घराजवळच एका मित्राच्या वाढदिवसाच्या मेजावनीला गेला होता. येथे त्याचा आरोपींसमवेत अगदी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी रिंकू शर्मा याची घरात जाऊन हत्या केली. रिंकू शर्मा आणि आरोपी यांनी मिळून रोहिणी भागात एक रेस्टॉरन्ट उघडले होते. या धंद्यात त्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादही झाले होते’, असे सांगितले. रिंकू शर्मा यांचा भाऊ मनू शर्मा याने मात्र त्यांच्या मालकीचे कोणतेही रेस्टॉरन्ट नसल्याची माहिती दिली. ‘आमचे कोणतेही ‘फूड शॉप’ नाही. ५ ऑगस्टला श्रीराममंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी गेलो होतो, तेव्हाही ते (धर्मांध) आमच्यासमवेत भांडले होतेे’, असे त्यांनी सांगितले.
रिंकू याच्या आईने सांगितले की, मी रिंकू याला वाचवू शकले नाही. घराचे संपूर्ण आर्थिक दायित्व त्याच्या खांद्यावर होतेे.
‘जय श्रीराम’च्या घोषणेमुळे हत्या झाल्याचा कुटुंबियांचा दावा
रिंकू शर्मा यांनी ५ ऑगस्टच्या फेरीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. ‘हत्या होत असतांनाही तो ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होता’, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
का आणि केव्हापर्यंत अशा हत्या होत रहाणार ? – भाजपचे नेते कपिल मिश्रा
देहलीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी या हत्येवर ट्वीट करत, ‘श्रीराममंदिरासाठी अर्पण गोळा करणारे रिंकू शर्मा यांची हत्या होणे ही पहिली घटना नाही. आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांत देहलीत अंकित सक्सेना, ध्रुव त्यागी, डॉ. नारंग, राहुल, अंकित शर्मा हे सर्वच असेच मारले गेले होते. पण का ? आणि केव्हापर्यंत हे चालणार आहे ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रिंकू शर्माकडून इस्लामच्या पत्नीला रक्तदान, तर भावाला कोरोनाबाधित झाल्यावर साहाय्य !आरोपी इस्लाम याची पत्नी दीड वर्षांपूर्वी गर्भवती असतांना प्रसूतीच्या वेळी तिची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचाराच्या वेळी तिला रक्ताची आवश्यकता होती. त्या वेळी रिंकु शर्मा यांनी तिला रक्तदान केले होते. तसेच इस्लामचा भाऊ कोरोनाबाधित झाल्यावर रिंकू शर्मा यांनी त्याला रुग्णालयात नेऊन भरती केले होते. (हिंदूंनी कितीही धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव दाखवला, तरी धर्मांधांच्या लेखी ‘हिंदू काफीरच असून त्यांचा नाश करणेच धर्मानुसार योग्य आहे’, हे हिंदू लक्षात घेतील तो सुदिन ! – संपादक) |