धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांचा गोंधळ !
धुळे – येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘परिवार संवाद’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. त्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करतांना छायाचित्र काढण्यासाठी रेटारेटी केल्याने गोंधळ झाला. जयंत पाटील यांनी पक्षाच्या कामाचा आढावा न घेता म्हटले की, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अन्यायाविरुद्ध शहराच्या विकासासाठी आक्रमक व्हावे. शहरात चांगले कामे झाले पाहिजे. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. आढावा घेण्यासाठी मी पुन्हा येईन, असे सांगत कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतला. या वेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे हा गोंधळ पाहून हतबल झाले.