भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के
ऑस्ट्रेलिया खंडातील देशांना सुनामीची चेतावणी
नवी देहली – जगभरात गेल्या १२ घंट्यांमध्ये ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यात ईशान्य भारतातील मिझोराम राज्यालाही धक्का बसला आहे.
१. ऑस्ट्रेलियाजवळच्या प्रशांत महासागराच्या परिसराध्ये लॉयल्टी बेटांजवळ समुद्राखाली १० किमी अंतरावर १० फेब्रुवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास पहिला भूकंपाचा धक्का बसला. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिक्टर स्केल इतका तीव्र असल्याने या भूकंपानंतर न्यूझीलंड, वनूआतु आणि न्यू कॅलेडोनिया या देशांना सुनामीची चेतावणी देण्यात आली आहे. तेथील नागरिकांना समुद्रकिनार्यांपासून दूर रहाण्यास सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : गेल्या १२ तासांमध्ये ऑस्ट्रेलियापासून ते हिंदूकुश पर्वतांच्या प्रदेशापर्यंतच्या भागात ३ भूकंपाचे धक्के बसले आहेत. तीन धक्क्यांपैकी एक धक्का भारतातील मिझोराममध्येही बसला आहे. दरम्यान अमेरिकेच्या हवामानखात्याने ऑस्ट्रेलिया, न्युझालँड, फिजीhttps://t.co/RmEuzWk3Hr pic.twitter.com/KF4wkqDafq
— Ekmat (@EkmatTweet) February 11, 2021
२. या भूकंपानंतर काही घंट्यांनी म्हणजे रात्री १ च्या सुमारास भारतातील मिझोराममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. चंपाई येथे ३.१ रिक्टर स्केल भूकंपाचा झटका जाणवला.
३. मिझोरामच्या भूकंपानंतर काही घंट्यांनी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा झटका बसला. हिंदकुश पर्वतरांगात बसलेला हा भूकंपाचा झटका ४.९ रिक्टर स्केलचा होता. पहाटे ४ च्या सुमारास हा भूकंप जाणवला.
४. प्रशांत महासागरामधील भूकंप हा भूमीखाली खोल अंतरावर झाल्याने मिझोराम आणि हिंदकुशमधील भूकंप हे ‘आफ्टर शॉक’ प्रकारातील असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे.