‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशातही विक्री, आणखी एका आरोपीला अटक
‘पॉर्न व्हिडिओ’चे चित्रीकरण केल्याचे प्रकरण
मुंबई – ‘पॉर्न प्रॉडक्शन आस्थापना’ने बनवलेल्या ‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशात विक्री करणार्या उमेश कामत याला पोलिसांनी ८ फेब्रुवारी या दिवशी अटक केली. उमेश हा विहान कारखान्याचा पदाधिकारी आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या ७ झाली आहे. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये येऊ पहाणार्या तरुणींना मालिका, वेब सिरीज, तसेच चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर बळजोरी करून ‘पॉर्न फिल्म’ बनवणारी अभिनेत्री गहना वसिष्ठ आणि तिचे ६ साथीदार यांंना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली.
7th accused arrested in Mumbai porn racket casehttps://t.co/h3709EeMM8 pic.twitter.com/bIdUIqfFgX
— HTMumbai (@HTMumbai) February 9, 2021
Property cell of the Mumbai crime branch arrested film director Tanvir Hasmi from Surat in connection with the pornography racket https://t.co/lHh0V4eD9h
— HTMumbai (@HTMumbai) February 10, 2021
या सर्वांच्या चौकशीमध्ये भारतीय ‘पॉर्न व्हिडिओं’ना परदेशात पुष्कळ मागणी असून गहना आणि तिचे आस्थापन हे व्हिडीओ उमेश कामत याला देत असल्याचे समोर आले. गहना ही अश्लील चित्रफीती उमेश याला पाठवत होती. उमेश परदेशातील काही लोकांच्या संपर्कात असून ‘पॉर्न वेबसाईट’ आणि ‘अॅप’ चालवणार्यांना या चित्रफीती विकत होता. चित्रफीती विकून आलेल्या पैशांतून शुल्क घेऊन उर्वरित पैसे तो गहना हिला देत असे. त्यांनी अशाप्रकारे किती अश्लील व्हिडिओ परदेशात विकले, याविषयी अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.