महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजण्यामागील कारणे
बुद्धीप्रामाण्यवादी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजतात !‘धर्मांतरित ख्रिस्ती पोपपेक्षा जास्त कडवे असतात’, अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. त्याप्रमाणे विज्ञानाची केवळ तोंडओळख असणारे महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारखे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी शास्त्रज्ञांपेक्षा स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. धर्मांतरित व्यक्तींप्रमाणे अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मने अधर्माच्या विचारांनी कलुषित झालेली असणे
‘धर्मांतरित करण्यापूर्वी व्यक्तीच्या मनात हिंदु धर्माविषयी विष पेरले जाते आणि त्याचे मन कलुषित केले जाते. कलुषित मन कोणत्याही प्रकारचे तर्क-वितर्क करू शकत नाही आणि सत्य जाणू शकत नाही. अशीच स्थिती अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांची झालेली असते. त्यामुळे त्यांची हिंदु धर्माची श्रेष्ठता समजण्याची क्षमता संपलेली असते. त्यांचे मन अधर्माच्या विचारांनी इतके कलुषित झालेले असते की, त्यांना हिंदु धर्मातील सकारात्मक विचार ग्रहणच करता येत नाहीत.
२. धर्मांतरित व्यक्तींप्रमाणे अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा बुद्धीभेद होऊन त्यांची बुद्धी तामसिक झालेली असणे
धर्मांतरित झालेल्या व्यक्तींचा बुद्धीभेद केलेला असतो. त्यामुळे त्यांची बुद्धी तामसिक झालेली असते. त्यामुळे त्यांना हिंदु धर्मातील पवित्र आणि सात्त्विक ज्ञान ग्रहण करता येत नाही. त्याचप्रमाणे अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांची बुद्धी तामसिक झालेली असते. त्यामुळे त्यांना हिंदु धर्माच्या ज्ञानाची सूक्ष्मता आकलन होत नाही.
३. धर्मांतरित व्यक्तींमध्ये असणार्या नवीन पंथाच्या अहंकाराप्रमाणे अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांमध्ये बुद्धीचा अहंकार असणे
‘धर्मांतरितांचे मन आणि बुद्धी कलुषित अन् तामसिक झाल्यामुळे त्यांचा विवेक नष्ट होऊन त्यांचा अहंकार वाढलेला असतो. त्यामुळे ते जेव्हा नवीन पंथ स्वीकारतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एक कडवेपणा असतो. त्याचप्रमाणे स्वत:ला विज्ञानवादी म्हणवून घेणार्या महाराष्ट्रातील अंनिसवाल्यांसारख्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा विवेक नष्ट होऊन त्यांना बुद्धीचा अहंकार झाल्यामुळे ते स्वत:ला शास्त्रज्ञांपेक्षा अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजतात.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१८, रात्री ११.३५)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |