जागतिक शक्ती’ म्हणून भारताच्या उदयाचे आम्ही स्वागत करतो ! – अमेरिका
अमेरिकेने म्हटले म्हणजे भारत ‘जागतिक शक्ती’ झाला, असे होत नाही, तर प्रत्यक्षात भारताने तो पल्ला गाठणे महत्त्वाचे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत आमचा महत्त्वाचा सहकारी आहे. आघाडीची जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदयाचे आम्ही स्वागत करतो. या प्रदेशात भारताची भूमिका सुरक्षा प्रदान करणार्या देशाची राहील, असे प्रतिपादन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पत्रकार परिषदेत केले.
US Secretary of State @ABlinken spoke with his Indian counterpart @DrSJaishankar, where the two leaders reaffirmed the ties between both the countries and discussed mutual concerns, including the military coup in #Myanmar https://t.co/fBaaTKC7HR
— WION (@WIONews) February 10, 2021
प्राइस पत्रकारांना म्हणाले की, आमचे सरकार सर्वोच्च पातळीवर वेगवेगळया आघाड्यांवर सहकार्य, मैत्री संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करेल. भारत-अमेरिकेची भागीदारी, मैत्री अधिक भक्कम आणि दृढ होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.