देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी करावयाचे उपाय
१. स्वतःला लागणार्या सर्व प्रकारच्या वस्तू स्वतःच्या राष्ट्रात बनवायच्या. आयात कर वाढवून परदेशी आयात बंद करावी.
२. कचर्याच्या भावाने खनिजे किंवा कच्च्या मालाची निर्यात करण्यापेक्षा पक्का माल देशात बनवावा.
३. सर्व्हिस टॅक्स काढून निर्यात स्पर्धात्मक बनवा. त्यामुळे महागाई २०० टक्क्यांनी न्यून होईल.
४. दोन लक्ष कोटी रुपयांची निर्यात सबसिडी वाचेल.
५. खाद्य वस्तूंची निर्मिती भारतातच होण्याकरता गाववार पाण्याचे नियोजन केल्यास २ लक्ष कोटी रुपये वाचतील.
६. तीस टक्के रस्ता वाहतूक रेल्वेकडे हस्तांतरित (ट्रान्सफर) करावी. त्यासाठी रेल्वे मार्ग वाढवावे लागतील. त्यातून ५० सहस्त्र कोटी रुपयांच्या डिझेलची बचत होईल.
७. ऐंशी कोटी गावांतील लोकांना वर आणण्यासाठी ठाकूर पॅटर्न समरडॅम सिस्टिम हा एकच मार्ग आहे. त्यामुळे १ लक्ष कोटी रुपयांच्या फूड सिक्युरिटी बिलाची (राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा) आवश्यकता वाटणार नाही. त्यामुळे रुपया सुधारेल.
– श्री. शंकर गोविंद ठाकूर (प्रकाश)
(संदर्भ : श्री पूर्णानंद वैभव, महापुण्यतिथी विशेषांक २०१४)