डिसेंबर २०१९ मध्ये वुहान (चीन) बाजारपेठेच्या बाहेर कोरोनाचा प्रसार झाल्याचे पुरावे सापडले ! – जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचा दावा
वुहान (चीन) – डिसेंबर २०१९ च्या आधी वुहान शहरात कोरोना विषाणूचे कोणतेही संकेत नव्हते. याआधी शहरात कोरोनाचा संक्रमण झाल्याचेही कोणते पुरावे सापडलेले नाहीत; मात्र डिसेंबर २०१९ मध्ये वुहानमधील बाजारपेठेच्या बाहेर त्याचा प्रसार झाल्याचे पुरावे सापडले आहेत, असे येथे अन्वेषण करण्यास गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वुहान येथील प्रयोगशाळेतूनच जगभरात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटनेचे बेन एम्ब्रेक यांनी दिलेल्या माहितीनुसार पथकाला वुहान किंवा इतर कुठेही डिसेंबर २०१९ पूर्वी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचा पुरावा सापडला नाही. नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे कोरोना संसर्ग झाला यासंबंधी कोणतेही ठोस पुरावे सापडले नाही.
No indication of coronavirus in China’s Wuhan city before December 2019, says WHO team
The team also said that Covid-19 virus could have been circulating in other areas before it was identified in Wuhan. https://t.co/avk28SN1mP
— scroll.in (@scroll_in) February 9, 2021