रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्यावर ‘आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे’, असे वाटून आनंद अनुभवता येणे
‘३०.५.२०१९ या दिवशी ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात सेवेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा आश्रमातील प्रत्येक साधकाकडून प्रेमभाव, काटकसर, नियोजनकौशल्य इत्यादी गुण मला शिकायला मिळाले. तेव्हा मला वाटले, ‘हा आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे. इथेच सर्व आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकताच नाही !’ आश्रमातील सर्व वस्तूंकडे पहातांना माझा भाव जागृत होत होता. दिवसभरात अनेक वेळा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील भगवंतच साधकांसाठी हे सर्व करू शकतो’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता. आश्रमात असतांना आनंद अनुभवायला मिळाला, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. माधवी महेश कोकाटे, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. (९.६.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |