मनसैनिकांकडून पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास मारहाण !

नवी मुंबई – येथील वाशी पथकर नाक्यावर कामास असलेल्या उत्तर भारतीय तरुणास मराठी का येत नाही ? असा जाब विचारला जात असतांना पथकर नाक्यावरील उतेकर नावाच्या एका मराठी कर्मचार्‍याने मध्यस्थी करतांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्ते यांनी त्या पथकर नाक्यावरील उतेकर यांना शोधून मनसे शाखेत नेऊन मारहाण केली आणि क्षमा मागायला लावली.