न्यूयॉर्क विधानसभेकडून ‘५ फेब्रुवारी’ हा ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित
|
|
न्यूयॉर्क (अमेरिका) – न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार ‘५ फेब्रुवारी’ हा दिवस ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित करण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये ‘५ फेब्रुवारी’ हा दिवस ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा करतो. काश्मीरमधील नागरिकांच्या कथित हक्कांचे जतन व्हावे, यासाठी पाक हा दिवस साजरा करतो. न्यूयॉर्क विधानसभेमधील सदस्य नादर सायेघ आणि अन्य १२ सदस्य यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावाचा भारताने निषेध केला आहे.
India calls out attempts to misrepresent J&K’s rich mosaic https://t.co/E9O6SBXxAA
— Kashmir Observer (@kashmirobserver) February 7, 2021
वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासामधील प्रवक्त्यांनी यावर म्हटले की,
#NewYork Assembly passes #Kashmir resolution; #India calls out attempts to misrepresent J-K’s rich mosaic https://t.co/9YMTeSxuOi
— The Tribune (@thetribunechd) February 7, 2021
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याला कोणीही भारतापासून वेगळे करू शकत नाही. जम्मू-काश्मीरच्या संस्कृती आणि सामाजिक एकतेच्या संदर्भातील व्याख्या आणि संमत करण्यात आलेला ठराव हा चिंतेचा विषय आहे. भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर तसेच न्यूयॉर्कमधील सर्व भारतीय समुदायाच्या वतीने न्यूयॉर्कमधील विधानसभेच्या सर्व सदस्यांशी भारत चर्चा करणार आहे.