(म्हणे) ‘सचिन तेंडुलकरकडून भारतरत्न काढून घ्या !’ – जातीयवादी संभाजी ब्रिगेडची मागणी
पुणे – सचिन तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकर्यांच्या विरोधात बोलत आहे. क्रिकेटमध्ये तू एक जानवेधारी होता; म्हणून सगळे तुझ्या पाठीशी उभे राहिले. आमची मुले बहुजन समाजातून गेलेली असल्यामुळे त्यांना तिथे स्थान दिले जात नाही. तसेच शेतकरी स्वरक्षणासाठी आंदोलन करत आहेत, हे दिसत नाही का ? अकलेचे तारे तोडणार्याचा ‘भारतरत्न’ काढून घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. (खेळाडूंनाही जातीद्वेषातून पहाणारे उद्या समाजामध्ये जातीद्वेष पसरवणार नाहीत कशावरून ? प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी केलेल्या अशा मागण्यांना भारतीय जनता निश्चितच महत्त्व देणार नाही ! – संपादक)
विदेशामधील काही लोक भारतातील आंदोलनाविषयी भारतीय शासनाच्या विरोधात टीका करत असल्याने सचिन तेंडुलकर यांनी त्यांना प्रत्युत्तर देत ‘भारतासाठी काय योग्य आहे, हे भारतीय ठरवतील’, अशा आशयाचे ट्विट केले होते.
सौजन्य : टीव्ही 9 मराठी