ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाविषयी कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने ५.७.२०२० या दिवशी झालेल्या ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाविषयी कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांच्या जीवनातील सर्वात मोठा सण; परंतु या वेळी कोरोना महामारीमुळे प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने सर्व साधक, धर्मप्रेमी आणि समाजातील व्यक्ती यांच्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुरुपरंपरेचे पूजन साधकांना साधनेविषयी असलेले प्रश्न आणि अडचणी अन् त्यांना गुरुदेवांनी दिलेली उत्तरे याविषयीची ध्वनीचित्रचकती आणि आपत्काळात साधनेची आवश्यकता याविषयी संतांचे मार्गदर्शन यांचे नियोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व एक सहस्र पटींनी कार्यरत असते. सहस्रो लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घेतला. अशा या अलौकिक कार्यक्रमात सहभागी झालेले साधक आणि धर्मप्रेमी यांना अनेक अनुभूतीही आल्या. अनेकांनी श्री गुरु हे साक्षात् ईश्वराचे सगुण रूप आहेत, असेही अनुभवले.
या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/448621.html
३. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती
३ ई. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी उत्साह वाटून सण असल्यासारखे जाणवणे : मला सणाच्या वेळी वातावरणात आनंद वाटत नाही; मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुष्कळ आनंद जाणवला. मला घरात उत्साह वाटत होता आणि सण असल्याप्रमाणे जाणवत होते. गुरुदेवच सर्व काही करवून घेणार आहेत; परंतु आमचे प्रयत्नही अपेक्षित आहेत. सर्वांना श्री गुरूंचा आशीर्वाद लाभू देे. – धर्मप्रेमी श्री. मंजुनाथ, तुमकुरु
३ उ. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहून मित्राकडे गेल्यावर त्याला सुगंध येणे आणि त्याला हा गुरुपूजेचा महिमा आहे, असे सांगणे : मला गुरुपौर्णिमेची पूजा पहाण्याचे भाग्य लाभले. मला कार्यक्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. मी त्याच्या घरी जाताच त्याने किती सुगंध येत आहे ! काय लावले आहेस ?, असे मला विचारले. प्रत्यक्षात मी काहीच लावले नव्हते. त्यांचे हे वाक्य ऐकून मला गुरुदेवांविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच आहे, असे वाटले. मी त्यांना म्हणालो, हा गुरुपूजेचा महिमा आहे. – अधिवक्ता एम्.एन्. बाडगी, लक्ष्मेश्वर
३ ऊ. कार्यक्रम कुठलाही अडथळा न येता पाहू शकणे : आमच्याकडे प्रत्येक रविवारी सुटीला ४ – ५ बाहेरचे लोक एकत्र येतात; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी एकटाच होतो. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम कुठलाही अडथळा न येता पाहू शकलो. मी माझ्या बेंगळुरूच्या मित्राला लिंक पाठवली. त्यानेही कार्यक्रम पाहिला. मी डिसेंबरमध्ये भारतात परत येईन. यापुढे मी समितीच्या कार्यात संपूर्णपणे सहभागी होईन. – श्री. शशिधर उद्यावर, उडुपी
४. श्री गुरूंची पूजा असल्याने एकभुक्त रहाणारे बागलकोट येथील श्री. आर्.एस्. पाटील आणि त्यांचे कुटुंबीय
श्री. आर्.एस्. पाटील – हे येथील उद्योगपती आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने ऑनलाईन कार्यक्रमातील मार्गदर्शन संपल्यावर स्वतः दूरभाष करून सांगितले, ऑनलाईन कार्यक्रम घरातील सर्व सदस्यांनी पाहिला. श्री गुरूंची पूजा असल्याने घरात सर्वांनी एकभुक्त रहाण्याचे (एकदाच जेवण्याचे व्रत) व्रत केले. – एक साधक, कर्नाटक
५. गुरुपौर्णिमेला गुरुदेवांनी घरी येऊन दर्शन दिले, असे वाटणे
मी विदेशात असतो. पूजेच्या वेळी येथे पहाटेचे ५.३० वाजले होते. मी तत्परतेने उठून कार्यक्रमात सहभागी झालो. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मला नेहमी रामनाथी आश्रमात जावे, असे वाटते; परंतु काही वर्षांपासून काहीतरी अडचण येऊन माझे जाणे झालेे नाही. या वेळी गुरुपौर्णिमेला गुरुदेवांनी घरी येऊन दर्शन दिले, असे वाटून मला पुष्कळ आनंद झाला. – डॉ. उमेश नागलोटीमठ
६. आस्थापनाकडून अर्पण करवून घेणे
गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने उद्योगपतींसाठी घेतलेल्या सत्संगात ते सहभागी झाले होते. श्री गुरु अन् अर्पण यांचे आपल्या जीवनातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन मिळाल्यावर आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहिल्यावर त्यांनी स्वतः राईस मिल असोसिएट यांना धर्मकार्यात सहभागी करवून घेतले. – श्री. जनार्दन मुळ्ळुरू, बागलकोटे
७. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याचे साधकांनी सांगितल्यामुळे एका उद्योजकांनी कार्यक्रम पाहिला. – एक साधक, कर्नाटक
८. गुरुपौर्णिमा पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. – श्री. मारुति, गोकाक, बेळगाव.
९. ऑनलाईन कार्यक्रमाचे व्यवस्थितपणे नियोजन केले होते !
गेल्या वर्षी मी गोकाकच्या गुरुपौर्णिमेत सहभागी झालो होतो. तुमच्या सर्व कार्यक्रमात व्यवस्थित नियोजन असते. या वर्षी ऑनलाईन कार्यक्रम असूनही तेवढेच व्यवस्थितपणे नियोजन केले होते. पूजा व्यवस्थित आणि शिस्तबद्ध केली. ती पाहून मला पुष्कळ आनंद झाला. – श्री. सुभाष नारायण कोक्कडे, गोकाक, बेळगाव
१०. गुरुदेव साधकांशी संभाषण करत असलेल्या विषयामुळे हिंदु बांधव जागृत होण्यास साहाय्य झाले !
या कार्यक्रमामुळे मला गुरु-शिष्य परंपरेविषयी अधिक माहिती मिळाली. गुरुदेव साधकांना सांगत असलेला विषय उपयुक्त होता. त्यामुळे सर्व हिंदु बांधव जागृत होण्यास साहाय्य झाले आहे. तुमच्या कार्यक्रमांना माझे सहकार्य आहे. असे कार्यक्रम समाजात अधिकाधिक प्रसारित व्हावेत. गुरु आणि संत यांचे मार्गदर्शन सर्वांना प्राप्त होऊ दे. – श्री. गुरुराज, शिवमोग्गा
११. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करीन !
मला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चांगला वाटला. गुरुदेवांनी सांगितल्यानुसार मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करीन. मी नामजप अधिक केला पाहिजे. संतांच्या मार्गदर्शनातून पुढील भयानक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वच स्तरांवर सुदृढ होण्याच्या आवश्यकतेची मला जाणीव झाली. मी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होईन आणि याविषयी माझ्या मित्रांनाही सांगीन. – आय.आय. सुमंत, शिवमोग्गा
१२. गुरुपौर्णिमेच्या वेळी सांगितलेल्या माहितीनुसार आचरण केल्यास निश्चितच पालट होईल !
गुरुपौर्णिमेच्या वेळी सांगितलेली माहिती आपल्या जीवनात लागू केली, तर आपल्यात निश्चितच पालट होईल, असे मला वाटले. त्या दिवशी आमच्या घरी ५ – ६ नातेवाईक आले होते. त्या सर्वांना कार्यक्रम पहाण्याचे भाग्य लाभले. त्यांनी त्यांचा भ्रमणभाष क्रमांक देऊन आम्हालाही अशा सत्संगाची लिंक पाठवा. पुष्कळ चांगली माहिती मिळत आहे, असे सांगितले. – श्री. शिवकुमार हेगडे, उद्योगपती, शिवमोग्गा
१३. गुरुपौर्णिमा सत्संग पाहून पुष्कळ आनंद झाला !
कोणत्याही कामात मागे-पुढे काळजी घेणारे असले पाहिजेत, तसेच साधना, म्हणजे गुरु पाहिजेतच. तुम्ही सर्व कष्ट घेऊन इतके करत आहात. आम्ही घरातील सर्व जण धर्माचरण करतो. आम्ही श्री गुरुदेव दत्त । हा नामजपही करतो. – सौ. प्रभा व्यंकटेश, सागर येथील वर्गणीदार, शिवमोग्गा
१४. गुरुचरणी सेवेसाठी पात्र झाले पाहिजे !
गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. रमानंदअण्णांचे मार्गदर्शन ऐकून पुष्कळ आनंद झाला. आम्हाला त्यांचे मार्गदर्शन सदैव लाभू दे. ते बोलतांना किंवा मार्गदर्शन करतांना सर्व दुःख विसरायला होते. गुरुचरणी सेवेसाठी पात्र झाले पाहिजे, हे लक्षात आले. त्यांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली मलाही साधना करून पुढे गेले पाहिजे, असे मला वाटते. – माजी मंत्री रत्नाकर यांच्या पत्नी श्रीमती नैजला रत्नाकर, हितचिंतक, शिवमोग्गा
१५. गुरुदेवांचे चलत्चित्र पाहून मला पुष्कळ आनंद झाला !
गुरुदेवांचे चलत्चित्र पाहून मला पुष्कळ आनंद झाला. मी अनावश्यक चलत्चित्र (व्हिडिओ), छायाचित्रे इत्यादी बघणे सोडले आहे. मी माझा अहं गुरुचरणी अर्पण केला आहे. गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी मी यापुढे सात्त्विक आहारच घेईन, असा मनात संकल्प केला आहे. – श्री. बालगंगाधर (वेबसाईट व्हिजिटर), कोडिकल, मंगळुरू.
१६. असे सत्संग धर्मकार्य करण्यास साहाय्यक होतात !
गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पुष्कळ चांगला होता. पूजाविधी आमच्याच घरात होत आहे, असे मला वाटत होते. आता आम्हाला सर्व सत्संग मिळणे कठीण आहे. आपत्कालात करायचा नामजप आणि उपाय सनातन संस्थेकडून जाणून घेऊन करत आहे. असे सत्संग धर्मकार्य करण्यास साहाय्यक होतात. – सी.के. याजी, शिवमोग्गा
१७. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्तम होता !
गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्तम होता. मी गुरुदेवांना पहातांना मला पुष्कळ आनंद झाला. गुरुदेवांचा साधकांशी झालेला संवाद ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. – विवेक प्रभु, दामोदर ज्युवेलर्स, गुरुपुर कैकंब, मंगळुरू
१८. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले !
मला आजपर्यंत श्री गुरूंचे महत्त्व समजले नव्हते. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. – श्री. शिवानंद बंटे, श्रीराम सेना, गोकाक, बेळगाव
१९. मला गुरुपौर्णिमेचा पूर्ण कार्यक्रम बघणे जमले नाही; मात्र असे कार्यक्रम अधिकाधिक पहावे, असे मला वाटले. या कार्यक्रमामुळे मला आनंद होऊन शांत वाटले. मी असे कार्यक्रम न चुकता पाहीन. – डॉ. श्रीकांत, शिवमोग्गा
२०. ऑनलाईन गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला. प्रामुख्याने संतांनी केलेली प्रार्थना ऐकून मला समाधान वाटले. – विद्या बेकल, शिवमोग्गा
२१. अशा सत्संगात श्री गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितल्याविषयी धन्यवाद ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साधना करण्याचा प्रयत्न करीन. – मल्लीकार्जुन ज्युवेलरी, कार्तिक ज्युवेलरी, शिवमोग्गा
२२. गुरूंचे मार्गदर्शन ऐकून पुष्कळ चांगले वाटले !
गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला. मार्गदर्शनही अत्युत्तम होते. (त्यांनी रामनाथी येथील आश्रमाला भेट देण्याविषयी रुची दाखवली. त्यांनी नातेवाइकांनाही लिंक पाठवली होती. त्यांनीही चांगला अभिप्राय व्यक्त केला. – संकलक) – श्री. जगदीश पै, मालक, हंग्यो आईस्क्रीम, मणिपाल, उडुपी
२३. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्तम होता आणि गुरुदेवांचा साधकांशी झालेला संवाद हा कार्यक्रम अद्भुत होता. तो पाहून मला आनंद झाला. गुरुचरणकमली प्रणाम ! – श्री. रघुवीर नगरकर, रा.स्व. संघाचे सक्रीय कार्यकर्ता, उडुपी
२४. आज दाखवलेला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. आपत्कालात जगण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? ते माझ्या लक्षात आले. – अधिवक्त्या सौ. भवानी, देरेबैल, मंगळुरू
२५. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला. पूर्वी झालेले कार्यक्रम पहाण्यास मला काहीतरी अडचण यायची; परंतु आज कुठलीही अडचण न येता चांगल्या रीतीने पूर्ण कार्यक्रम पहाणे मला साध्य झाले. – अधिवक्ता सतीशकुमार भट, मंगळुरू
२६. मी आणि माझ्या पत्नीने कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम हिंदी भाषेत होता. मला कार्यक्रम पूर्ण समजला नाही; पण कार्यक्रम पुष्कळ उपयोगी आणि उत्साहवर्धक होता. – श्री. प्रशांत, बायोलॉजी प्राध्यापक, मंगळुरू विश्वविद्यालय
२७. गुरुपौर्णिमा महोत्सव अर्थगर्भित होता. मला हिंदी भाषेत झालेला भाग समजला नाही. गुरुदेव आमच्यात विशेष पालट करायला सांगत आहेत, असे मला वाटत होते. – श्री. मंजुनाथ, शिवमोग्गा
(समाप्त)