मोतिहारी (बिहार) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणारे दोघे अटकेत, तर ५ जण पसार
आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित
अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !
मोतिहारी (बिहार) – येथे २१ जानेवारी या दिवशी नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकूण ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पथक बनवण्यात आले आहे. कुंडवा चैनपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणी प्रथम गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. यावरून ठाणे अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे.
बिहार के मोतिहारी में 15 दिनों पूर्व एक नाबालिग बच्ची की रेप के बाद हत्या कर दी गई #Bihar #Crime #CrimeNews https://t.co/RRDDALIsIb
— AajTak (@aajtak) February 7, 2021
या घटनेच्या प्रकरणी ५ फेब्रुवारीला एक ऑडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. यात कुंडवा चैनपूर पोलीस ठाण्याचे अंमलदार संजीव कुमार रंजन आणि एक आरोपी रमेश शहा यांच्यातील चर्चा होती. यात ज्या दिवशी मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली त्या दिवशीची चर्चा होती. त्यात पोलीस अधिकारी संजीव कुमार हा रंजन शहा याला मुलीचा मृतदेह जाळण्याविषयी सांगत असल्याची चर्चा आहे. या ऑडिओनंतर रंजन यास निलंबित करण्यात आले. या प्रकरणाविषयी बिहार पोलीस मुख्यालयाने रंजन याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.