वेब सिरीजच्या नावाखाली ‘पॉर्न व्हिडिओ’चे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक
अश्लीलतेला प्रोत्साहन देणार्या वेब सिरीजवर बंदीच आणायला हवी !
मुंबई – ‘वेब सिरीज’च्या नावाखाली स्वतः ‘प्रोडक्शन हाऊस’द्वारे ‘पॉर्नोग्राफिक व्हिडिओ’चे चित्रीकरण करून ते संकेतस्थळावर ठेवल्याच्या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ फेब्रुवारी या दिवशी अटक केली.
Popular actress-model arrested for shooting pornographic videos in Mumbaihttps://t.co/sJLUbxjRVN
— Zee News English (@ZeeNewsEnglish) February 7, 2021
‘पॉर्नोग्राफिक’चे चित्रीकरण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. त्या वेळी पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती, तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या ५ जणांमध्ये २ अभिनेते आणि २ तरुणी यांचा समावेश आहे.
या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आल्या होत्या; मात्र त्या ‘पॉर्नोग्राफिक व्हिडिओ’ सिद्ध करणार्या ‘प्रोडक्शन हाऊस’च्या जाळ्यात अडकल्या. या प्रकरणाच्या अन्वेषणात अभिनेत्री गहना वशिष्ठ हिचे नाव समोर आले होते. गहना हिने दिग्दर्शिका एकता कपूर यांच्या ‘गंदी बात’ या वेब सिरीजमध्येही काम केले आहे.