अन्केन, ऑस्ट्रिया येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेचा आढावा
अन्केन, ऑस्ट्रिया येथे २८ ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आली. ४ साधक आणि ९ जिज्ञासू यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. उपस्थित जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि कार्यशाळेतील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे पुढे दिली आहेत.
१. वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
अ. कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला वाहिलेली फुले ३ दिवस टवटवीत राहिली.
आ. कार्यशाळेच्या समारोपाच्या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि सनातन आश्रम (गोवा) यांविषयी माहिती देणारे चलत्चित्र दाखवण्यात आले. ते पहातांना साधकांना पुष्कळ अनुभूती आल्या. सर्वजण शांत बसले होते आणि त्यांना कार्यशाळा संपू नये, असे वाटत होते.
२. जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती
२ अ. आध्यात्मिक त्रास वाढल्याने दुसर्या दिवशी कार्यशाळेत न जाण्याचा विचार मनात येणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवल्याने नामजपादी उपाय करता येऊन कार्यशाळेत उपस्थित रहाता येणे : मार्च २०२० पासून केर्स्टिन माटेन एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगात येत असून कार्यशाळेच्या आदल्या रात्री त्यांना पुष्कळ आध्यात्मिक त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना कार्यशाळेला जाऊ नये, असे वाटत होते. त्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवले. मी तुझ्या समवेतच आहे. सर्वकाही चांगले आहे, असेही ते म्हणत असल्याचे त्यांना जाणवले. या अनुभूतीनंतर त्यांना नामजपादी उपाय सहजतेने करता आले अन् शांत झोपही आली. त्यामुळे त्या दुसर्या दिवशी कार्यशाळेला उपस्थित राहू शकल्या.
२ आ. भाव असल्यामुळे त्रास न्यून होणे आणि त्यामुळे आध्यात्मिक त्रास होत असतांना घाबरून न जाता देवावर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्यता मिळणे : कार्यशाळेतील सकाळच्या सत्रात केर्स्टिन यांना आध्यात्मिक त्रास होत असतांना त्यांनी आदल्या रात्रीची भावपूर्ण अनुभूती उपस्थितांना सांगितली. त्यानंतर त्यांना होत असलेला त्रास उणावला. त्यामुळे अष्टांग साधनेतील भाव या पैलूचे सामर्थ्य त्यांच्या लक्षात आले. त्रास होत असतांना घाबरून न जाता भावजागृतीचे प्रयत्न केल्यामुळे देवावर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्यता मिळते, हे त्यांना शिकता आले.
२ इ. साधनेला पालकांचा विरोध असूनही तळमळीने सत्संगात उपस्थित रहाणे आणि नामजपादी उपाय करणे : बायक्वान झॅन्ग (स्वित्झर्लंड) यांचे वय १७ वर्षे असून गेल्या ६ मासांपासून ते सत्संगात नियमितपणे उपस्थित असतात. त्यांच्यात भाव, आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे. ते ३ वर्षांपासून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाचे वाचक आहेत. ते तळमळीने नामजपादी उपाय करण्यासह सत्संग आणि कार्यशाळा यांना उपस्थित रहातात. कार्यशाळेमुळे त्यांना साधना समजली, प्रारब्ध स्वीकारणे सुलभ झाले आणि त्यामुळे त्यांचा कृतज्ञता भाव जागृत झाला.
२ ई. साधकांचा प्रेमभाव पाहून सद्गदित होणे : मार्सेल ब्राऊन (स्वित्झर्लंड) यांना मी काही आठवड्यांपूर्वी बासल येथे भेटलो. त्यानंतर त्यांनी नामजप करण्यास आरंभ केला. लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून ते संपर्कात आले होते. साधकांचा त्यांच्याप्रती प्रेमभाव पाहून ते सद्गदित झाले. त्यांना जीवनात काही नकारात्मक अनुभव होते; पण माझ्याशी बोलल्यानंतर त्यांचे मन मोकळे झाले आणि त्यांनी सेवाही केली.
परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
– जर्मनीतील साधकांचे कुटुंब
संकलक : सद्गुरु सिरियाक वाले, युरोप (सप्टेंबर २०२०)
कार्यशाळेत सहभागी झालेल्या जिज्ञासू आणि साधकांसमवेत १ सद्गुरु सिरियाक वाले