यवतमाळ येथे वीजदेयक दरवाढीच्या विरोधातील भाजपच्या आंदोलनामध्ये पत्रकाराला पोलिसांकडून मारहाण !
यवतमाळ, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाच्या काळातील वाढीव वीजदेयक रहित करण्याकरिता भाजपच्या वतीने ५ फेब्रुवारी या दिवशी ताला ठोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली, तर महाव्हाईस न्यूजचे पत्रकार सचिन येवले यांना पोलिसांकडून मारहाण झाली. या मारहाणीचा भाजपचे आमदार मदन येरावार यांनी निषेध व्यक्त करून पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.