देशभरात शेतकर्यांच्या ‘रस्ता बंद’ आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद
नवी देहली – देहलीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी देशभरात दुपारी १२ ते ३ या वेळेत ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. देहली, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना यातून वगळण्यात आल्याची घोषणा शेतकरी संघटनेने केली होती. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून देहतीलतील १० मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. संपूर्ण देशात या आंदेलनाला संमिश्र स्वरूपात यश मिळाले.
#ChakkaJam : Barricades, heavy security in place on Delhi-Meerut Expressway pic.twitter.com/7ZV1Yn78z0
— TOI Delhi (@TOIDelhi) February 6, 2021
काही राज्यांत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वाहने रोखण्यात आली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत झाली; मात्र या काळात कुठेही हिंसाचाराचे वृत्त नाही.