कु. शर्वरी कानस्कर हिने सादर केलेल्या विविध प्रकारच्या गीतांवरील नृत्यांचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या साधकावर झालेला परिणाम
दुर्ग (छत्तीसगड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असणारी कु. शर्वरी कानस्कर (वय ११ वर्षे) हिने सादर केलेल्या विविध प्रकारच्या गीतांवरील नृत्यांचा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या साधकावर झालेला परिणाम
‘८.११.२०१८ या दिवशी दुर्ग (छत्तीसगड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असणारी कु. शर्वरी कानस्कर (वय ११ वर्षे) हिच्या नृत्याचा तीव्र त्रास असणार्या साधकांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास एका नृत्याद्वारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केला. या वेळी मला जाणवलेली विविध सूत्रे पुढे देत आहे. पौष कृष्ण पक्ष दशमी (६.२.२०२१) या दिवशी कु. शर्वरी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
कु. शर्वरी कानस्कर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. कु. शर्वरी कानस्कर हिचे घुमर नृत्य पहातांना जाणवलेली सूत्रे
१ अ. कु. शर्वरी रजोगुणी गाण्यावर नृत्य करत असूनही तिने केलेल्या कथ्थक नृत्यातून अनुभवता आलेला आनंद साधकाला पुन्हा अनुभवता येणे, तसेच ‘कु. शर्वरीसारख्या दैवी बालकांमध्ये रज-तमाला नष्ट करण्याचे किती सामर्थ्य आहे’, हेही अनुभवता येणे : ‘कु. शर्वरी कानस्कर नृत्य करत असतांना तिच्याकडे सतत पहात रहावे’, असे वाटत होते. ती कथ्थक नृत्य करत असतांना जसा आनंद मला अनुभवता आला होता, तसाच आनंद ती करत असलेले घुमर नृत्य पहातांनाही मी अनुभवत होतो. ज्या गाण्यावर ती नृत्य करत होती, ते रजोगुणी आहे; परंतु कु. शर्वरी त्यावर नृत्य करत असतांना त्या नृत्यातून सात्त्विक स्पंदनेच प्रक्षेपित होत होती. ‘पुढे येणार्या ईश्वरी राज्यासाठी सध्या पृथ्वीवर जन्म घेत असलेली दैवी बालके सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात आणि त्यांच्यामध्ये रज-तम नष्ट करण्याचे किती सामर्थ्य आहे’, हे कु. शर्वरी हिने केलेले घुमर नृत्य पहातांना अनुभवायला मिळाले.
१ आ. कु. शर्वरी करत असलेल्या नृत्यातून साधकावर उपाय होणे आणि तिच्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याशी लढण्यासाठी साधकाला त्रास देणार्या वाईट शक्तीचे त्याच्या देहातील अस्तित्व वाढू लागल्याने त्याच्या मनाची चंचलता वाढणे : गेल्या दोन मासांपासून मला होणार्या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढली आहे. कु. शर्वरीच्या नृत्यातून माझ्यावर उपाय होऊ लागले. ३ – ४ वेळा नृत्य झाल्यावर त्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याशी लढण्यासाठी मला त्रास देणार्या वाईट शक्तीचे माझ्या देहातील अस्तित्व वाढू लागल्याने माझ्या मनाची चंचलता वाढू लागली.
२. कु. शर्वरी कानस्कर हिने पाश्चात्त्य गाण्यांवर भारतीय पद्धतीचे नृत्य सादर करतांना जाणवलेली सूत्रे
२ अ. कु. शर्वरी पाश्चात्त्य गाण्यावर नृत्य करत असतांना ती भारतीय गाण्यावरच नृत्य करत असल्याचे वाटणे, तसेच तिच्याभोवती त्रास असणार्या साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत असूनही तिची एकाग्रता न ढळणे : कु. शर्वरी कानस्कर हिने ४ – ५ पाश्चात्त्य गाण्यांवर भारतीय पद्धतीचे नृत्य सादर केले. तिची त्या गाण्यांवरील नृत्याची लय पाहून ‘ती भारतीय पद्धतीच्या गाण्यावरच नृत्य करते आहे’, असे वाटत होते. ती नृत्य करत असतांना ५ – ६ साधकांना त्रास होऊ लागला, तरीही तिची एकाग्रता ढळली नाही.
२ आ. कु. शर्वरी करत असलेल्या नृत्यातील मुद्रांमधून मारक तत्त्व प्रक्षेपित होऊन उपस्थित असणार्या आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना चैतन्य मिळणे: नृत्य करतांना ती करत असलेल्या मुद्रांमधून मारक तत्त्व प्रक्षेपित होत होते. त्याचा साधकांना त्रास होत होता. तिच्या पदन्यासामुळे उपस्थित असलेल्या तीव्र त्रास असणार्या साधकांना चैतन्य मिळत होते.
२ इ. कु. शर्वरी करत असलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्या मारक शक्तीशी लढण्यासाठी साधकाला जोर लावावा लागणे अन् त्यामुळे साधकाच्या स्वतःचे मनातील रज-तमात्मक विचारांत वाढ होणे : नृत्याच्या आधी काही दिवसांपासून माझ्या त्रासात वाढ झाली होती. कु. शर्वरी नृत्य करतांना तिच्याकडून मारक शक्ती प्रक्षेपित होत असल्याने त्या शक्तीशी लढण्यासाठी मला आध्यात्मिक स्तरावर जोर लावावा लागत होता. त्यामुळे माझे मन आणि बुद्धी यांवरील नियंत्रण सुटू लागले. त्याचा परिणाम म्हणून माझ्या मनातील रज-तमात्मक विचारांमध्ये वाढ झाली. त्यामुळे माझे मन अस्वस्थ झाले.
३. कु. शर्वरी कानस्कर हिने पाश्चात्त्य संगीताच्या तालावर आधारित हिंदी गाण्यावर पाश्चात्त्य पद्धतीचे नृत्य सादर करतांना जाणवलेली सूत्रे
३ अ. ‘कु. शर्वरी ज्या गाण्यावर नृत्य सादर करत होती, ते गाणे ऐकू नये’, असे मला वाटत होते. त्या गाण्यातील शब्द, चाल आणि त्याचे पार्श्वसंगीत यांमुळे माझ्या मनाला पुष्कळ अस्वस्थता आली.
३ आ. कु. शर्वरी नृत्य करत असतांना साधकाच्या मनात नृत्य करण्याचा विचार येऊनही त्याने स्वत: नृत्य न करणे : कु. शर्वरी नृत्य करत असतांना माझ्या मनात २ – ३ वेळा ‘समोर जाऊन आपणही नृत्य करावे’, असा विचार आला. मला तसे करणे अयोग्य वाटत असल्याने मी जागेवरच बसून राहिलो.
३ इ. पाश्चात्त्य पद्धतीचा पोषाख, पाश्चात्त्य संगीत आणि नृत्य यांमुळे वातावरण आणि उपस्थित साधक यांवर झालेले परिणाम
३ इ १. या नृत्याच्या वेळी कु. शर्वरी हिने पाश्चात्त्य पद्धतीचा पोषाख, म्हणजे ‘टी-शर्ट’ आणि ‘जीन्स पॅन्ट’ परिधान केले होते. तिचा पोषाख, संगीत आणि नृत्य हे सर्व पाश्चात्त्य पद्धतीचे असल्याने वातावरणात रजोगुण मोठ्या प्रमाणावर पसरला.
३ इ २. कु. शर्वरीवर या नृत्याचा विपरीत परिणाम न होणे; मात्र तेथे उपस्थित असलेल्या तीव्र त्रास असणार्या साधकांना पुष्कळ त्रास होणे आणि वातावरणातील वाईट शक्तींनी साधकाचा प्राणमय कोष अन् मनोमय कोष यांतील ऊर्जा खेचून घेणे : कु. शर्वरी हिची स्वतःची आध्यात्मिक पातळी आणि तिला असलेली ईश्वरप्राप्तीची तळमळ यांमुळे तिच्यावर या सर्वांचा काही परिणाम होत नसला, तरी तेथे उपस्थित असणार्या तीव्र त्रास असणार्या साधकांना पुष्कळ त्रास झाला. बरेचसे साधक शांत बसून नृत्य पहात आहेत, असे दिसत होते; मात्र तेथे निर्माण झालेल्या एकूण वातावरणामुळे वाईट शक्तींनी सर्व साधकांभोवती काळ्या शक्तीच्या धुराचे जाड असे कडे निर्माण केले होते. त्याच्या माध्यमातून वातावरणातील वाईट शक्ती तेथे उपस्थित साधकांचा प्राणमय कोष आणि मनोमय कोष यांतील ऊर्जा खेचून घेत होत्या.
४. कु. शर्वरीच्या नृत्यानंतर साधकाचा रक्तदाब न्यून होण्यास आरंभ होणे, नृत्य थांबलेले असतांनाच्या कालावधीतही रक्तदाब न्यून होण्याची प्रक्रिया तशीच चालू असणे आणि यावरून तिच्या नृत्याचा परिणाम बराच कालावधीपर्यंत साधकाच्या शारीरिक स्थितीवर होत असल्याचे लक्षात येणे
८.११.२०१८ या दिवशी झालेल्या कु. शर्वरीच्या पहिल्या नृत्यापूर्वी माझा रक्तदाब १३०/१०० होता, तर नृत्यानंतर तो १३०/९२ एवढा न्यून झाला. दोन्ही नृत्यांच्या मध्ये जवळजवळ १ घंट्याचा कालावधी होता. तिच्या दुसर्या नृत्यापूर्वी माझा रक्तदाब १२४/९० होता, तर नृत्यानंतर तो १२०/८८ एवढा न्यून झाला, म्हणजे पहिल्या नृत्यानंतर माझा रक्तदाब न्यून होण्याची प्रक्रिया पुढेही चालू राहिली. तिसर्या नृत्याच्या वेळी माझा रक्तदाब १२०/९० एवढा होता. नृत्यानंतर तो १२०/८० एवढा झाला. यावरून कु. शर्वरी हिच्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा परिणाम माझ्या शारीरिक स्थितीवर बराच काळ होत होता’, हे लक्षात येते.
– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०१८)
|