हरिद्वार येथील कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील सायकली, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !
हरिद्वार (उत्तराखंड) येथील महाकुंभपर्व !
‘११ मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व आहे. कुंभकाळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील १०० हून साधक हरिद्वार येथे वास्तव्याला असणार आहेत. या काळात कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत. तसेच १० सुस्थितीतील सायकली आवश्यक आहेत.
साधक, वाचक, हितचिंतक वा धर्मप्रेमी यांच्याकडे सर्व कागदपत्रांची (आर्.सी बूक, पीयुसी, विमा (इन्शुरन्स) आदी) पूर्तता असलेली वरील प्रकारची वाहने, तसेच सायकली असल्यास ते काही काळासाठी ती वापरायला देऊ शकतात. इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
साधकांचे नातेवाईक अथवा परिचित हरिद्वार, देहरादून येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन अथवा कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.
जे हितचिंतक प्रत्यक्ष वाहन अथवा सायकल देऊ शकत नाहीत, ते काही वाहनांसाठी किंवा सायकलीसाठी लागणारा व्यय (खर्च) धन रूपात अर्पण देऊ शकतात.
नाव आणि संपर्क क्रमांक : श्री. श्रीराम लुकतुके – ७०१२०८५१८४