हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा आज झंझावात !

मुंबई – शनिवार, ६ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यमे, फलकप्रसिद्धी, तसेच वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांद्वारे लाखो जिज्ञासूंपर्यंत लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे.

असा केला प्रसार…

१. या सभेसाठी ३२६ हून (गोवा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर) अधिक ठिकाणी फलकप्रसिद्धी करण्यात आली.

२. गोवा येथे एका मंदिरात प्रोजेक्टरवरून सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करणार आहेत.

३. सभेच्या निमित्ताने उद्योजक, आधुनिक वैद्य, धर्मप्रेमी, तसेच समाजातील विविध घटकांच्या मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन’ बैठका घेण्यात आल्या. लाखो लोकांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.

४.‘ऑनलाईन’ सभा घोषित झाल्यानंतर त्याचा ‘डीपी’ आला होता. त्याचा प्रसार अधिकाधिक करण्याचे सूत्र सोलापूर येथील धर्मप्रेमींच्या ऑनलाईन बैठकीत सांगितल्यावर श्री. विकास तांबे यांनी त्यांच्या ओळखीच्या गटात तो पाठवला. त्यानंतर त्वरित ७ ५. व्हॉट्सअ‍ॅप गटांनी सभेचा डीपी ठेवून धर्मप्रसार केला.

५. सोलापूर जिल्ह्यातील २ वृत्तवाहिन्या आणि २१ न्यूज पोर्टल यांनी सभेचे थेट प्रक्षेपण करणार असल्याचे सांगितले.

अन्य विशेष

१. सोलापूर, लातूर, धाराशिव, फलटण येथील ५० धर्मप्रेमींनी वैयक्तिक संपर्क, फलकप्रसिद्धी करणे, ऑनलाईन बैठकांचे आयोजन करणे, सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसार अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सभेचा धर्मप्रसार उत्स्फूर्तपणे केला.

२. पुणे येथे ‘पीसीएस्एस् नेटवर्क पिंपरी’ यांनी ३ फेब्रुवारीपासून तळपट्टी दाखवण्यास प्रारंभ केला आहे. ‘इन्पीसीएम्सी’ या केबल नेटवर्कने ४ फेब्रुवारीपासून निमंत्रण तळपट्टी दाखवण्यास प्रारंभ केला आहे.

३. आळंदी (जिल्हा पुणे) येथील भागवताचार्य ह.भ.प. सोमेस्वर महाराज आणि तबलाविशारद ह.भ.प. निखिल महाराज यांना सभेचा विषय सांगितल्यावर महिला कार्यकर्त्यांना ते म्हणाले की, तुम्ही महिला असूनही धर्माचे कार्य करत आहात हे विशेष आहे. तुम्ही सभेची लिंक पाठवा. आम्ही सभा निश्‍चितपणे ऐकू आणि सभेची लिंक इतरांनाही पाठवू.

४. पुणे येथे धर्मप्रेमींनी हाताने लिहिलेले पोस्टर किंवा छायांकित प्रती, तसेच छापील प्रती या माध्यमांतूनही प्रसार केला. आतापर्यंत एकूण १०० ठिकाणी फलकप्रसिद्धी आणि ४८ हाती पोस्टर लावण्यात आले. ८ वाचकांनीही या प्रसारात सहभाग घेतला. दुकाने आणि इमारती येथे अनुमती घेऊन फलक लावले.

पुणे येथील अनेक धर्मप्रेमी ‘प्ला कार्ड’च्या माध्यमातून सभेचा सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसार करत आहेत, तर अनेक धर्मप्रेमींनी सभेमध्ये सहभागी होण्याविषयी आवाहन करणार्‍या बाईटद्वारे प्रसार केलेला आहे. येथील सनातन प्रभातचे वाचकही विविध माध्यमातून सभेचा उत्स्फूर्तपणे प्रसार करत आहेत.