गुरुदेवांच्या कृपेने येणार्या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया !
आली आता हिंदु राष्ट्राची वेळ, उठा सर्वांनी ध्येय घेऊया ।
गुरुदेवांच्या कृपेने येणार्या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया ॥
हीच वेळ आहे ती, आपल्या मंदिरांचे सरकारीकरण थांबवूया ।
गुरुदेवांच्या कृपेने येणार्या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया ॥
आपल्यातून होणार्या प्रसाराचे ध्येय निश्चित करूया ।
प्रत्येक हिंदूमध्ये हिंदूतेजा जागवूया ॥
खूप झाले सहन करणे आता षंढपणा झटकूया ।
गुरुदेवांच्या कृपेने येणार्या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया ॥
गुरुदेवांची अद्भुत अशी कृपा झाली, धर्मसभेच्या माध्यमातून हिंदूंना हिंदुत्वाला जोडली ।
हीच गुरुदक्षिणा आपल्याला पण देता यावी म्हणून सेवा परिपूर्ण करावी ॥
हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा आली ।
उठा हिंदूंनो, उठा हीच ती वेळ आली ॥
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुन्हा जोमाने प्रसार करूया ।
गुरुदेवांच्या कृपेने येणार्या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया ॥
‘हे हिंदवी स्वराज्य’ व्हावे, ही श्रींची इच्छा ।
घेऊनी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा, करूया निर्धार आता ।
उठा हिंदूंनो, गुरुदेवांच्या कृपेने येणार्या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया ॥
– श्री. अभिषेक टाकळे, कोल्हापूर
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |