कोरोनाच्या दुसर्या लाटेला थोपवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक ! – उद्धव ठाकरे
मुंबई – राज्यात अनुमाने ३ लाख ५० सहस्र कोरोनाचे लसीकरण झाले आहे. ब्रिटन, ब्राझील या देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत, ते पहाता लोकांनी बेसावध न रहाता अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्या वेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, समूह प्रतिकारशक्तीमुळे राज्यात लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या अल्प झाली आहे, असे जर मानत असू, तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतरही युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे ३ आणखी ‘स्ट्रेन’ असून आपल्याकडे ते पसरू नयेत, यासाठी जागरूकता बाळगावी लागेल.