विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात अपात्रता याचिका
सरकारी कंत्राट घेत असल्याचा आरोप
पणजी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या विरोधात मडगाव येथील शिरीश कामत यांनी अपात्रता याचिका प्रविष्ट केली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले एक आस्थापन सरकारी कंत्राट घेत असल्याचा याचिकादाराचा आरोप आहे. हे आस्थापन सार्वजनिक बांधकाम खाते आणि जलस्रोत खाते यांची कंत्राटे घेत होते. गोवा विधानसभेचे सदस्य असतांनाही विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भागीदार असलेले आस्थापन कंत्राटे घेत असल्याने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना मार्च २०१७ पासून आमदार या नात्याने अपात्र ठरवावे, अशी मागणी याचिकादाराने केली आहे.