शांत, आनंदी आणि हसतमुख असणारी महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. श्रीनिधी सम्राट देशपांडे (वय १ वर्ष) !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गर्भारपण – ३ ते ६ मास
१ अ. गुरुपौर्णिमेच्या रात्री ग्रंथप्रदर्शन कक्षावर रात्री उशिरापर्यंत सेवा करणे आणि ग्रहण असूनही कोणताच त्रास न होणे : ‘गर्भारपणाच्या या कालावधीत मला मळमळणे, अन्नाची इच्छा नसणे, यांव्यतिरिक्त कोणताही विशेष शारीरिक त्रास झाला नाही. गुरुपौर्णिमेच्या रात्री ग्रहण होते. तेव्हाही मी उशिरापर्यंत ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करत होते. एरव्ही मला ‘डोके जड होणे, काही न सुचणे, थकवा येणे’, असे त्रास जाणवतात; परंतु त्या दिवशी मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास झाला नाही.
१ आ. ७ ते ९ मास
१ आ १. जोगेश्वरीदेवीच्या मंदिरात गेल्यावर उत्स्फूर्तपणे प्रार्थना होणे : आम्ही काही कामानिमित्त पुणे शहरात गेलो असतांना मला श्री जोगेश्वरीदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची इच्छा झाली. तेव्हा देवीला पाहून माझ्याकडून उत्स्फूर्तपणे पुढील प्रार्थना झाली, ‘हे देवी, हे बाळ तुझेच रूप असू दे. तुझी अखंड कृपा या बाळावर राहू दे. या बाळाची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आणि भक्ती असू दे. या बाळाकडून तू गुरुदेवांचे कार्य करवून घे.’ प्रार्थना करतांना माझा भाव जागृत झाला आणि देवीप्रती पुष्कळ ओढ निर्माण झाली.
१ आ २. अनुभूती : सकाळी ११.३० ची वेळ असल्याने बाहेर उन्हामुळे गरम वाटत होते; पण देवळात बसल्यावर मला पुष्कळ थंड आणि शांत वाटत होते. मला त्या मंदिरात गेल्यावर नेहमी गारवा जाणवतो. ‘देवी जागृत आहे’, असे वाटते. मंदिरात आल्यावर बाळाची हालचाल पुष्कळ वाढली होती.
१ इ. जन्मानंतर – जन्म ते १ मास
१ इ १. बाळाचा जन्म १५.१.२०२० या दिवशी (मकरसंक्रांतीच्या दिवशी) सकाळी ८.४३ वाजता झाला. माझी प्रसूती सर्वसाधारण झाली.
१ इ २. बाळाच्या जन्माच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू सज्जनगडावर समर्थांच्या समाधीजवळ असणे, साधिकेने त्यांना दिलेल्या कापडी पिशवीत त्यांनी हात घातल्यावर समर्थांचे वस्त्र हाती लागणे आणि ‘हा प्रत्यक्ष समर्थांनी बाळासाठी आशीर्वाद दिला आहे’, असे त्यांनी सांगणे : बाळाचा जन्म झाल्या झाल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा त्या सज्जनगडावर समर्थांच्या समाधीजवळ होत्या. आमच्या घरी त्या वास्तव्यास असतांना त्यांना मी एक मोठी कापडी पिशवी (‘शॉपिंग हँडबॅग’) दिली होती. बाळाच्या जन्माच्या वेळीच त्यांनी त्या पिशवीत हात घातला आणि त्या पिशवीतून त्यांना समर्थांचे वस्त्र मिळाले. त्यांनी सांगितले, ‘‘हे सर्व घडणे, म्हणजे प्रत्यक्ष समर्थांनी बाळासाठी आशीर्वाद दिला आहे.’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचे हे बोल ऐकून माझा भाव दाटून आला. त्यांच्या बोलण्यातून ‘प्रत्यक्ष महालक्ष्मीने आमच्या बाललक्ष्मीस आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.
१ इ ३. तोंडवळा शांत आणि आनंदी असणे : बाळाचा जन्म झाल्यावर तिची दृष्टी एकदम स्थिर होती. तिचा तोंडवळा शांत आणि आनंदी जाणवत होता. पहिला एक मास तिचा तोंडवळा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही वेळेस पालटत होता.
१ इ ४. बाळाच्या कपाळावर श्रीकृष्णाला टिळा असतो, तसा लाल रंगाचा टिळा जन्मतःच आहे. – सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे (श्रीनिधीची आई)
१ इ ५. जन्मतःच देवाची आवड असणे : ‘बाळाच्या जन्मापूर्वी ‘गुरुदेवांना अपेक्षित असे साधना करणारे सात्त्विक बाळ जन्माला यावे’, असे वाटत होते. श्रीनिधीला भजने, नामजप, देवतांची गाणी यांची आवड आहे. तिला गुरुदेवांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र आवडते. ती त्याकडे पाहून हसते.
१ इ ६. दृष्टी स्थिर असणे : तिच्या डोळ्यांचा भाग निळसर आहे. तिची दृष्टी स्थिर आणि अंतर्मुख आहे. तिची निरीक्षणक्षमता चांगली असल्याचे जाणवते.
– श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे (श्रीनिधीचे वडील)
१ इ ७. बाळाचे नाव ‘श्रीनिधी’ ठेवणे : ‘आम्ही बाळाचे नाव ‘श्रीमयी’ ठेवायचे’, असे ठरवले होते. तेव्हा पुरोहितांनी विष्णुसहस्रनामाचा संदर्भ देऊन ‘श्रीनिधी’चा अर्थ श्रीविष्णु आणि श्रीलक्ष्मी असे दोन्ही होतो’, असे सुचवले. त्यामुळे आम्ही ‘श्रीनिधी’ हे नाव ठेवायचे निश्चित केले.
– सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे
१ इ ८. श्रीनिधीला घेऊन बसल्यावर आजीचा शारीरिक त्रास दूर होऊन तिला शांत आणि प्रसन्न वाटणे : ‘श्रीनिधी एक मासाची असतांना मी तिला माझ्याकडून झालेल्या चुका सांगून क्षमायाचना करायचे. तेव्हा ती मला हसून प्रतिसाद द्यायची. मला शारीरिक त्रास होत असतांना तिला घेऊन बसले की, शांत आणि प्रसन्न वाटायचे.’ – सौ. नयना रायकर (श्रीनिधीची आजी, आईची आई), गावभाग, सांगली.
१ ई. वय २ ते ४ मास
१ ई १. मोठ्या भावाशी (अर्जुनशी) आध्यात्मिक स्तरावरचे नाते असणे : आपल्याकडे बाळ येणार आहे, याविषयी अर्जुनशी (श्रीनिधीचा मोठा भाऊ अर्जुन) बोलल्यावर तो म्हणाला, ‘‘मला लक्ष्मीदेवीसारखी बहीण पाहिजे.’’ ‘अर्जुनचे बाळाशी आध्यात्मिक स्तरावर नाते आहे’, असे जाणवते. लहान मुलांना ‘आईने मला घ्यावे, माझ्यावर प्रेम करावे’, असे वाटते; पण अर्जुनच्या मनात तिच्याविषयी मत्सर जाणवत नाही. तीसुद्धा अर्जुनशी चांगल्या प्रकारे खेळते आणि त्याला बघून आनंदी होते.
१ ई २. ‘प.पू. डॉक्टर’ असे म्हटल्यावर हुंकार देणे : श्रीनिधी २ मासांची असतांना तिला आम्ही वेगवेगळे नामजप ऐकवत असू. तिला ‘प.पू. आबा’ आणि प.पू. डॉक्टर’, असे म्हणून दाखवल्यावर ती हुंकार देऊन प्रतिसाद देत होती.
– सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे
१ उ. ५ मास ते ११ मास
१ उ १. सहनशील : ‘ती रुग्णाईत असतांना न रडता आजार शांतपणे सहन करते. तिने झोप आणि भूक यांसाठी कधीही रडून आकांडतांडव केले नाही. – सौ. प्रज्ञा आणि श्री. सम्राट देशपांडे
१ उ २. एका जागी बसून शांतपणे भजने किंवा नामजप ऐकणे : ‘तिला सांभाळतांना श्रीकृष्णाचे भजन किंवा श्रीमत्भागवतमधील श्लोक म्हणून दाखवल्यावर तिला विशेष आनंद व्हायचा. भजने ऐकतांना ती त्यात तल्लीन होऊन ऐकत बसतेे. श्रीनिधी ४० ते ५० मिनिटे एका जागी बसून शांतपणे भजने किंवा नामजप ऐकायची.’ – सौे. सुलोचना श्रीहरि देशपांडे आणि श्री. श्रीहरि बाबुराव देशपांडे (आजी-आजोबा)
१ उ ३. ‘श्रीनिधी स्वभावाने शांत आहे. ती सतत हसतमुख असते. तिला पाहून प्रसन्न वाटते.’ – श्री. नरेंद्र रायकर, (आजोबा, आईचे वडील) गावभाग, सांगली.
१ उ ४. ‘तिचा तोंडवळा हसतमुख आणि तेजस्वी दिसतो अन् ‘ती अंतर्मुख आहे’, असे जाणवते.’ – श्री. आदित्य रायकर (मामा), कोथरूड, पुणे
२. स्वभावदोष
‘श्रीनिधी हळूहळू जेवते. तिला खाऊ घालण्यास किमान ४५ – ५० मिनिटे लागतात. ती जेवण्याचा कंटाळा करते. शेवटी रडत रडत जेवते.
‘हे श्रीकृष्णा, परात्पर गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित असा श्रीनिधीचा सांभाळ करण्यात आम्ही अल्प पडत आहोत. यासाठी आम्ही तुमच्या चरणी क्षमायाचना करतो. आपणच आमच्याकडून श्रीनिधीचा योग्य असा सांभाळ करवून घ्यावा’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’
– सौ. प्रज्ञा सम्राट देशपांडे आणि श्री. सम्राट श्रीहरि देशपांडे (डिसेंबर २०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |