गुरुदेव, तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ।
या दळणवळण बंदीमध्ये गुरुदेव, तुमचाच आधार ।
यावे लवकर सेवेत, वाटे झालो आम्ही निराधार ।
‘सेवा’ हेच असे सुस्वप्न, करण्या जीवन साकार ।
तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ॥ १ ॥
गुरुदेव, तुमच्या आठवणीतून शक्ती मिळे फार ।
कृतज्ञ, कृतज्ञ तुमच्याप्रती तुम्ही जीवनाचे शिल्पकार ।
शिल्पकार केले तुम्ही, देऊन आम्हा सद्विचार ।
संताची आणि समाजाची ओळख, ज्ञान देता अपार ॥ २ ॥
‘सनातन प्रभात’मध्ये भरले आहे चैतन्य आणि सात्त्विकता भावे मनी ।
अन्य वृत्तपत्रे केवळ देती माहिती, ज्ञानाचा भाग अल्प ।
आनंद देऊन सावध करितो तो, येई संकटकाळ म्हणूनी ।
गुरुदेव, तुमच्या आशीर्वादाने भारित तो, कृतज्ञ आम्ही ॥ ३ ॥
परम पूज्य, साधक सतत विनवती तुम्हा क्षणोक्षणी ।
श्वासोच्छ्वासी नाम वाढू दे, हीच मागणी ॥ ४ ॥
– श्रीमती अर्चना मराठे, वाळपई, गोवा. (२८.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |