शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे भेसळयुक्त दूध जप्त
सांगली – भेसळीच्या संशयावरून शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी मे. सटवाई दूध संकलन केंद्रावर धाड टाकून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे. म्हैस आणि गाय यांचे दूध, रिफाइंड सोयाबीन तेल यांचे नमुने तपासणीसाठी घेऊन शिल्लक साठा जप्त करण्यात आला. नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त सु.आ. चौगुले यांनी दिली.