घरोघरी आयुर्वेद
प्रश्न : दही आणि गूळ एकत्र घेतल्यास ?
उत्तर : स्नेहनं तर्पणं हृद्यं वातघ्नं सगुडं दधि ॥ – चरकसंहिता सूत्र २७/२७८
दही आणि गूळ हे मिश्रण शरिराचे पोषण अन् स्निग्धता निर्माण करणारे, तसेच मनाला आनंद देणारे अन् वात न्यून करणारे आहे. असे असले तरीही या मिश्रणाच्या नियमित सेवनाने जंत वा त्वचाविकार होऊ शकतात. याकरताच नियमित व्यायाम करणार्या व्यक्तींनी अधूनमधून या मिश्रणाचे सेवन करण्यास हरकत नाही.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली