१५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येतील ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
मुंबई – विद्यार्थी आणि पालक यांच्या मागणीनंतर विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
याविषयी उदय सामंत म्हणाले, ‘‘महाविद्यालये विलंबाने चालू होत असल्यामुळे परीक्षेच्या निकालावर त्याचा थोड्या प्रमाणात परिणाम होईल. विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ परीक्षा देण्याची सवलत असेल. कोरोनामुळे वर्षातील महाविद्यालयाच्या एकूण दिवसांपैकी ७५ टक्के दिवस महाविद्यालयात उपस्थित रहाण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिकवणीचा पर्याय उपलब्ध राहील.’’
सौजन्य : टी.व्ही. 9 मराठी