कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिच्या विरोधात देहलीमध्ये गुन्हा नोंद
भारताच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करणार्यांना वचक बसेल, अशी कृती भारत सरकारने केली पाहिजे !
नवी देहली – देहली पोलिसांनी भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या ट्वीटमुळे कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिच्या विरोधात एफ्.आय.आर्. नोंदवला आहे. यात गुन्हेगारी कट रचणे आणि वैरभाव निर्माण करणे, असे आरोप थनबर्ग हिच्यावर ठेवण्यात आले आहेत.
स्वीडन की रहने वाली पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग के भड़काऊ ट्वीट को लेकर दिल्ली पुलिस ने उनके खिलाफ केस दर्ज किया है @tanseemhaiderhttps://t.co/cvPUZWP8yy
— AajTak (@aajtak) February 4, 2021
यावर थनबर्गने प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘मी शेतकर्यांसमवेत आहे. त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष, धमकी किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन यांमुळे यात पालट होणार नाही.’
(सौजन्य : Republic World) Greta Thunberg Deleted This Document From Her Twitter After Republic Exposed Her |