जगातील कोणत्याही देशाच्या सरकारने शेतकरी आंदोलनाचे समर्थन केलेले नाही ! – केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
नवी देहली – जगातील कोणत्याही देशातील सरकारने केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचे समर्थन केलेले नाही, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली.
No foreign govt has supported farmers’ protest: MEA in Lok Sabha https://t.co/4RqhfI0yKL
— Hindustan Times (@HindustanTimes) February 3, 2021
१. परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी सांगितले की, भारताचे मित्र राष्ट्र असणार्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाच्या सूत्रावर विधान केले होते; मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर भारताने त्यांना ‘भारताच्या अंतर्गत प्रकरणांसंदर्भात अशाप्रकारचे वक्तव्य हे अयोग्य आणि स्वीकार करण्यासारखं नाही’, असे सांगितले होते. भारताने दिलेल्या माहितीनंतर कॅनडा सरकारने शेतकर्यांसमवेत चर्चा करण्यासाठी भारत सरकारने घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केले आहे. कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि काही युरोपीयन देशांमध्ये भारतीय कृषी कायद्यांविषयी काही ‘प्रेरित’ भारतीय वंशाच्या व्यक्तींनी या कायद्यांना विरोध केला आहे.
२. शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत ‘कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत आहे’, असे कॅनडाचे पंतप्रसाध जस्टीन ट्रूडो यांनी डिसेंबर २०२०च्या प्रारंभी म्हटले होते.