मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायले !
मुंबई – ३ फेब्रुवारी या दिवशी येथील महापालिकेच्या एका बैठकीत महापालिकेचे शिक्षणाचे अंदाजपत्रक सादर करत असतांना सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून ‘सॅनिटायझर’ प्यायले. पाण्याची बाटली समजून त्यांनी ‘सॅनिटायझर’ची बाटली घेतली. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी पवार यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्यानंतर काही वेळासाठी पवार तेथून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा येऊन कामकाजात सहभागी झाले.