साधका, आता टाक तू पाऊल हिमतीने पुढे ।
त्रिकालज्ञानी, अलौकिक, अवतारी ।
समर्थ गुरु (टीप १) तुज लाभले ।
साधका, आता टाक तू पाऊल हिमतीने पुढे ॥ धृ. ॥
शंका-कुशंकांची गाडूनी भूत-पिशाचे ।
नको डोकावू भूतकाळी ।
नको भविष्याची चिंता ।
सदैव राहून स्थित वर्तमानकाळी ।
घे या घडीचा आनंद ।
साधका, घे या घडीचा आनंद ॥ १ ॥
‘न भूतो न भविष्यती’ ऐसे महान गुरु ।
तुज केवळ पूर्वसुकृते लाभले ।
तरीही शंका तुझ्या का मनी ।
झटकून टाक मनीची शंका-भीती ।
अन् टाक तू पाऊल हिंमतीने पुढे ।
साधका, टाक तू पाऊल हिंमतीने पुढे ॥ २ ॥
हिंदु राष्ट्राचा संकल्प गुरूंंचा ।
ध्यास घे हर घडी मनी त्याचा ।
त्या संकल्पाचे अचाट सामर्थ्य मनी तू जाण ।
अन् उचल पाऊल हिमतीने ।
साधका, तू पाऊल टाक पुढे ॥ ३ ॥
जोड दे त्यास व्यष्टी-समष्टी साधनेची ।
होऊनी नामामध्ये रममाण ।
संगती असे स्वभावदोषांचे ओझे ।
तेही शुद्धीसत्संगाचा ध्यास घेऊनी ।
सहजगत्या झटकून टाक ।
घडता असे सर्वकाही ।
आनंद मनीचा अंतरी आहे ।
याची निश्चित तुला जाणीव होईल ॥ ४ ॥
ज्याची गुरूंवर अढळ श्रद्धा ।
तयासी या आपत्काळाची काय तमा ?
माझे गुरु स्वयं आहेत काळावर स्वार ।
ते करतील सहजगत्या ।
मजसह हा आपत्काळाचा वेढा पार ।
हीच मनीची श्रद्धा, तुज देवो साधनेचे बळ ॥ ५ ॥
दे झोकूनी आता ।
हिंदु राष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्या ।
यामध्येच आहे तुझी समष्टी साधना ।
जी भावे गुरुमनाला ।
तेव्हा ऊठ साधका ।
तू पाऊल टाक हिमतीने पुढे ॥ ६ ॥
संकल्प गुरूंंचा सिद्ध झाला ।
हिंदु राष्ट्र पुढे दिसू लागले ।
शंका-कुशंकांची भूत-पिशाचेे झडून पडली ।
स्वागत करण्या हिंदु राष्ट्राचे,
मन तुझे सिद्ध झाले ।
न सांगता उत्साहाने आपोआपच पाऊल तुझे पडले ।
साधका, पाऊल तुझे पडले ॥ ७ ॥
टीप १ – परात्पर गुरु
या कवितेतून साधकाच्या मनातील द्वंद्व दाखवले आहे. शेवटी गुरूंवरील श्रद्धा या द्वंद्वावर मात करते आणि साधक निःशंक होऊन साधना करून आनंदी होतो. हे प्रत्येक साधकाच्या मनीचे द्वंद्व आहे. त्यामुळे प्रत्येकाला ‘हे आपलेच आत्मनिवेदन गुरुचरणी व्यक्त करत आहे’, असे वाटेल’, अशी कविमनाची धारणा आहे.’
– संकलक
श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (डिसेंबर २०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |