पुण्यातील लाल महाल पर्यटकांसाठी खुला, शिवप्रेमी आनंदित
पुणे – शिवप्रेमींकडून सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन अखेर ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा २ फेब्रुवारीपासून महापालिका प्रशासनाकडून लाल महाल नागरिकांसाठी उघडण्यात आला आहे. इतिहासाची साक्ष असलेला लाल महाल उघडण्यात आल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली हा लाल महाल नागरिकांसाठी बंद होता. त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार गेल्या काही काळापासून या दुमजली महालाच्या दुरुस्तीचे काम चालू होते; मात्र ५ वर्षे होऊनही ते काम अद्याप संपलेले नाही. याच संदर्भात संभाजी ब्रिगेडसह अन्य शिवप्रेमी संघटनांकडून महापालिकेतील सत्ताधार्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता.