यवतमाळ येथे खोटे दस्तऐवज सिद्ध करून शेतीची परस्पर विक्री
पडताळणी न करताच प्रभारी दुय्यम निबंधकाकडून मान्यता
वणी (यवतमाळ), ३ फेब्रुवारी (वार्ता.) – तालुक्यातील बोर्डा येथील मारोती वाभीटकर यांच्या नावे असलेल्या शेतीची खोटे दस्तऐवज सिद्ध करून परस्पर विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे या दस्तऐवजाला प्रभारी दुय्यम निबंधक जी.टी. रणमले यांनी मान्यता दिली. प्रकरण पोलिसात गेल्यानंतर निबंधकासमवेत अनेकांना नोटिसी दिल्या गेल्या. २० सप्टेंबर या दिवशी खोटे दस्तऐवज सिद्ध केल्याचे उघड झाले; मात्र हा प्रकार कुणी केला, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.