नागपूर येथील हुतात्मा सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे साहाय्य
नागपूर – ३ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने काटोलमधील पोलीस ठाणे परिसरात आयोजित कार्यक्रमात येथील हुतात्मा सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे साहाय्य शासनाच्या वतीने देण्यात आले. २ मासांपूर्वी काश्मीर खोर्यात झालेल्या आक्रमणात भूषण सतई हुतात्मा झाले होते.
सतई कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखाच्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक साहाय्य म्हणून वडील रमेश सतई आणि आई मीराबाई यांना प्रत्येकी ५० लाख असा १ कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला.