कुंभपर्वाच्या कालावधीत केलेल्या साधनेचे १ सहस्र पटीने फळ मिळत असल्याने धर्मप्रसाराच्या सेवेत (समष्टी साधनेत) सहभागी व्हा !
हरिद्वार (उत्तराखंड) येथील महाकुंभमेळ्याच्या कालावधीत सर्वत्रच्या साधकांना सेवेची अमूल्य संधी !
‘११ मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. या कालावधीत संपूर्ण भारतभरातील ७ कोटी भाविक हरिद्वार येथे गंगास्नान, संतदर्शन आणि तीर्थयात्रेच्या उद्देशाने येतात. या पर्वाच्या स्थळी आणि त्या काळात केलेल्या साधनेचे फळ इतर स्थळ-काळ यांच्या तुलनेने १ सहस्र पटीने अधिक मिळते. यासाठी सर्व संत, आध्यात्मिक संस्थांचे साधक, सांप्रदायिक, भक्त या ठिकाणी वास्तव्य करून साधनारत रहाण्याचा प्रयत्न करत असतात.
या कुंभपर्वाच्या कालावधीत हरिद्वार येथील कुंभक्षेत्रावर धर्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र जागृती अभियान व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ४ मोठी हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलक प्रदर्शने आणि अध्यात्मविषयक ग्रंथप्रदर्शने यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या काळात विविध धार्मिक मंडपांमध्ये हिंदु राष्ट्र विषयक व्याख्याने देणे, समविचारी संतांना संपर्क करणे, हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करणे इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
कुंभमेळ्यासाठी उपलब्ध विविध प्रकारच्या सेवा आणि त्यासाठी लागणारे साधक
कुंभमेळ्याच्या सेवेसाठी जिल्हासेवकांच्या माध्यमातून नावनोंदणी करा !
वय वर्षे १६ ते ६५ वयोगटातील साधक या सेवेत सहभागी होऊ शकतात. या सेवेसाठी मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अस्थमा हे जुनाट रोग असलेल्या साधकांनी सहभागी होऊ नये.
कुंभपर्वाच्या धर्मप्रसारांतर्गंत सेवेच्या पूर्वसिद्धतेला २५.२.२०२१ या दिवसापासून हरिद्वार येथे आरंभ होणार आहे. प्रत्यक्ष धर्मप्रसाराच्या सेवेसाठी १.३.२०२१ पासून ३०.४.२०२१ या दिवसापर्यंत मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. जे या धर्मप्रसाराच्या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, त्यांनी जिल्हासेवकांशी संपर्क साधावा. नोकरी करणार्यांनी शक्य असल्यास कार्यालयातून (ऑफिसमधून) रजा काढून या सेवेचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा. कुंभमेळ्याला न्यूनतम १५ दिवस सेवेत सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच हरिद्वार येथे दक्षिणेतील राज्यांतून येण्यासाठी २ – ३ दिवस लागतात. या दृष्टीने साधक आणि धर्मप्रेमी पुढील प्रकारे सहभागी होऊ शकतात.
अ. २५.२.२०२१ ते ५.५.२०२१ असे दोन महिने एक आठवडा (६९ दिवस) पूर्णवेळ सहभागी होणे (या साधकाला पूर्वसिद्धता आणि सेवेच्या समाप्तीच्या सेवा पूर्ण करणे, यांत सहभाग घेता येईल.)
आ. कुंभमध्ये सर्वाधिक गर्दी ११ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत असणार आहे. या दृष्टीने ७.३.२०२१ ते १५.४.२०२१ असे एक महिना एक आठवडा या कालावधीत (३९ दिवस) पूर्णवेळ सहभागी होणे
इ. २५.२.२०२१ ते १५.३.२०२१ या १९ दिवसांच्या कालावधीसाठी सहभागी होणे
ई. १४.३.२०२१ ते ३१.३.२०२१ या १८ दिवसांच्या कालावधीसाठी सहभागी होणे
उ. ३०.३.२०२१ ते १५.४.२०२१ या १७ दिवसांच्या कालावधीसाठी सहभागी होणे
ऊ. ८.४.२०२१ ते २८.४.२०२१ या २० दिवसांच्या कालावधीसाठी सहभागी होणे
या संदर्भात जिल्हासेवकांकडून निर्णय मिळाल्यानंतर लवकरात लवकर रेल्वेचे आरक्षण करणे अपेक्षित आहे. या काळात प्रचंड गर्दी असल्याने आयत्या वेळी रेल्वेची तिकिटे उपलब्ध होत नाहीत, हा अनुभव आहे.
नाव निश्चित झालेल्या साधकांना जिल्हासेवकांकडून कुंभसेवेसाठीचा रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवण्यात येईल. रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर साधकांनी हा ‘गुगल फॉर्म’ भरून नोंदणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. कुंभक्षेत्री साधकांचे निवास, सेवा-नियोजन आणि भोजन पथ्ये आदींसाठी नोंदणी प्रक्रिया आवश्यक आहे.