हरियाणातील गावामध्ये प्रवेश करण्यास भाजप आणि जजपा यांच्या नेत्यांना बंदी
कृषी कायदे रहित करण्याची मागणी
चरखी दादरी (हरियाणा) – चरखी दादरी जिल्ह्यातील एका गावात सत्ताधारी भाजप आणि आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या (जजपा) नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. ‘समसपूर गावामध्ये भाजप आणि जजपा यांच्या नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, अशी भूमिका गावकर्यांनी घेतली आहे. गावकर्यांनी ‘दोन्ही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेशबंदी आहे’ असे सांगणारे फलकही गावाच्या वेशीवर लावले आहेत. केंद्र सरकारचे ३ कृषी कायदे रहित करण्यासाठी ही गावबंदी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने गावात प्रवेश केला, तर त्याची जाहीर मिरवणूक काढण्यात येईल, असेही गावकर्यांनी स्पष्ट केले आहे.