महावितरणमध्ये वीजमीटरचा तुटवडा !
महावितरणमध्ये वीजमीटरचा तुटवडा असणे दुर्दैवी ! वीजमीटरचा तुटवडा कोणत्या कारणामुळे झालेला आहे, हे शोधून त्यावर त्वरित उपाययोजना काढणे अपेक्षित आहे.
वडगाव शेरी, पुणे – महावितरणच्या नगर रस्ता विभागात वीजमीटर उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील सर्व उपविभाग मिळून १ सहस्र ६०० मीटरची मागणी नोंदवण्यात आली आहे. नव्या वीजमीटरसाठी महावितरणकडे पैसे भरलेले ग्राहकही मीटरच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणने खासगी वितरकांकडून मीटर घेण्याची मुभा दिली असली तरी त्यांच्याकडेही मीटर उपलब्ध नाहीत. शिवसेनेचे शहर संघटक नितीन भुजबळ यांनी महावितरणकडे याविषयी विचारणा करून मीटरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच मीटरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे का ? याची चौकशी करावी, असेही त्यांनी सांगितले.