पोलिओ लसीकरणाच्या वेळी बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा
निष्काळजीपणे काम करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याची बाळाच्या आईची मागणी
अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार्यांना बडतर्फच करायला हवे !
पंंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पोलिओ लसीकरणाच्या वेळी १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असतांना पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात लसीकरणाच्या वेळी प्लास्टिकचा तुकडा उडून गेला आहे. या प्रकरणी पर्यवेक्षकासह दोन आरोग्य कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचार्यांच्या स्पष्टीकरणानंतर त्यांच्यावर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रेपाळ यांनी सांगितले. भाळवणी येथे माधुरी बुरांडे यांच्या एक वर्षाच्या बाळाला लस देतांना छोटासा प्लास्टिकच्या टोपणाचा तुकडा थेट बाळाच्या पोटात गेला होता. यानंतर तातडीने बाळाला बालरोग तज्ञांकडे नेऊन उपचार करण्यात आले. आता बाळाची प्रकृती व्यवस्थित असली, तरी निष्काळजीपणे काम करणार्या कर्मचार्यांवर कारवाईची मागणी बाळाच्या आईने केली आहे.