तरंगत्या ६ कॅसिनोंकडून कचरा विल्हेवाटीसंबंधीच्या नियमांचा भंग !
दक्षिण आशिया प्रायव्हेट लिमिटेड आस्थापनाच्या लेखा अहवालात उल्लेख
|
पणजी, २ फेब्रुवारी (वार्ता.) – मांडवी नदीत असलेल्या तरंगत्या ६ कॅसिनोंनी धोकादायक आणि इतर कचरा विल्हेवाटीसंबंधी वर्ष २०१९ च्या सुधारित कायद्यानुसार असलेल्या नियमांचा भंग केला असल्याचा उल्लेख ‘टीव्हीयू सूद’ दक्षिण आशिया प्रायव्हेट लिमिटेड आस्थापनाने आपल्या लेखा अहवालात केला आहे. त्यामुळे मांडवी नदीचे प्रदूषण झाल्याचे त्यांनी म्हटले.