‘सात्त्विक उत्पादनांच्या रूपातील संजीवनीच आपत्काळात सर्वांना तारणार आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
१. सात्त्विक उदबत्तीने ओवाळतांना उदबत्तीमधून पांढरा प्रकाश बाहेर पडत असल्याचे दिसणे आणि त्या वेळी ‘तिच्यात नामजपादी उपाय करण्याची क्षमता आहे’, याची जाणीव होणे
‘मी रहात असलेल्या खोलीच्या दारावर उपायांसाठी मारुतीचे चित्र लावले आहे. चित्राला सात्त्विक उदबत्तीने ओवाळतांना मला उदबत्तीतून पांढरा प्रकाश बाहेर पडतांना दिसला. उदबत्तीने खोलीची शुद्धी करतांना आणि स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढतांनाही मला वरीलप्रमाणेच उदबत्तीतून पांढरा प्रकाश बाहेर येतांना दिसला. त्या वेळी ‘सात्त्विक उदबत्तीमध्ये उपाय करण्याची क्षमता आहे’, याची मला जाणीव झाली.
२. सात्त्विक उदबत्तीच्या माध्यमातून होणार्या दैवी शक्तीच्या प्रकटीकरणामुळे वाईट शक्तीला उदबत्तीमुळे होत असलेले सूक्ष्मातील कार्य जाणवणे
त्या वेळी नामजपादी उपाय करतांना माझ्यातील वाईट शक्तीचे अस्तित्व अधिक प्रमाणात असल्यामुळे ‘वाईट शक्तीला उदबत्तीतून येणारा पांढरा प्रकाश दिसला’, असे मला जाणवले, तसेच सात्त्विक उदबत्तीच्या माध्यमातून होणार्या दैवी शक्तीच्या प्रकटीकरणामुळे वाईट शक्तीला उदबत्तीमुळे होत असलेले सूक्ष्मातील कार्य आणि स्वतःवर होणारा त्याचा सूक्ष्मातील परिणामही जाणवला. आमच्यासारख्या मानवांना स्थुलातून त्याचे महत्त्व लक्षात येत नाही.
३. सात्त्विक उत्पादनांचा वापर केल्यामुळे आध्यात्मिक त्रास न्यून होत असल्याची अनुभूती साधक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना येणे
वरील अनुभूतीमुळेच उदबत्तीचे सूक्ष्मातील कार्य आणि त्याचे महत्त्व लक्षात आले. ‘सात्त्विक उत्पादनांतून दैवी शक्तीच कार्य करत आहे’, याची निश्चितीही या आध्यात्मिक त्रासांमुळेच होतेे. ‘सात्त्विक उत्पादनांचा वापर केल्यामुळे आध्यात्मिक त्रास न्यून होतो’, याची अनुभूतीही त्यांचा वापर करणारे कित्येक साधक, हितचिंतक आणि धर्माभिमानी घेत आहेत.
४. सात्त्विक उत्पादनांची निर्मिती करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवजातीवर उपकार केले असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळेच सनातनचे साधक आणि समाजातील लोक यांच्यावर आध्यात्मिक उपाय होऊन त्यांचे त्रास न्यून होत आहेत. सात्त्विक उत्पादनांतून दैवी शक्तीच कार्य करत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सात्त्विक उत्पादनांची निर्मिती करून एक प्रकारे सर्व मानवजातीवर उपकारच केले आहेत. ‘सात्त्विक उत्पादनांच्या रूपातील ही संजीवनीच आपत्काळात सर्वांना तारणार आहेत’, याची जाणीव ठेवून सर्वांनीच त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करूया.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |