६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय १ वर्ष) !
पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त पद्मनाभच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. पद्मनाभ साळुंके याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. वय १ ते ३ मास
१ अ. ‘संतांनी बाळाचे नाव ठेवावे’, अशी इच्छा असणे, ‘पद्मनाभ’ हे नाव ठेवावे’, असे वाटणे, सद्गुरु गाडगीळकाकांनीही तेच नाव ठेवण्यास सुचवणे आणि तेव्हा ‘पद्मनाभ’ हे बाळाचे नाव ईश्वर नियोजित आहे’, असे वाटणे : ‘बाळाचे नाव काय ठेवायचे ?’, याविषयी विचार करूनही आम्हाला काही सुचत नव्हते; परंतु ‘संतांनी बाळाचे नाव ठेवावे’, अशी माझी तीव्र इच्छा होती. ‘बाळाचे नाव ‘प’वरून ठेवायचे’, असे ज्योतिषांनी सांगितले होते. त्यानंतर एकदा प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकतांना त्या भजनात ‘पद्मनाभ’ या नावाचा उल्लेख होता. तेव्हा ‘पद्मनाभ’ हे नाव ठेवावे’, असे मला वाटले. दुसर्या दिवशी रामनाथी आश्रमातून सौ. सायली करंदीकर हिचा दूरभाष आला आणि तिने सांगितले, ‘‘बाबांनी (सद्गुरु गाडगीळकाकांनी) बाळाचे नाव ‘पद्मनाभ’ ठेवू शकतो’, असे सुचवले आहे.’’ तेव्हा ‘हे ईश्वर नियोजित नाव आहे’, असे मला वाटले.
त्याच्या जन्मापूर्वी मला ‘कमलपुष्पात तान्हे बाळ का दिसले होते ?’, याचाही मला उलगडा झाला. बाळाच्या कपाळावर कमळाचा आकार आहे.
१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे गेल्यावर पद्मनाभ झोपेत असूनही हसणे, त्याने त्यांनी दिलेल्या भेटीवर हात ठेवणे आणि ‘त्याने तिचा स्वीकार केला’, असे वाटणे : पद्मनाभ १ मासाचा झाल्यावर आम्ही त्याला रामनाथी आश्रमात घेऊन गेलो होतो. त्या वेळी तो पूर्ण वेळ झोपला होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीकडे जाण्यास निघालो. तेव्हा पद्मनाभने डोळे उघडले; परंतु तो पुन्हा लगेचच झोपला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्याला घेतले. तेव्हा तो झोपेत असतांनाही हसला. मी त्याच्याविषयी त्यांना सांगतांनाही तो मधेच हसला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘त्याला सर्व कळत आहे.’’
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्याच्यासाठी माझ्या यजमानांकडे भेटवस्तू दिली. त्या वेळी त्याने तिच्यावर हात ठेवला. तेव्हा ‘त्याने तिचा स्वीकार केला’, असे मला जाणवले.
१ इ. देवीचे दर्शन घेतांना झोपेतून उठूून पुन्हा झोपणे : नंतर आम्ही त्याला घेऊन शांतादुर्गादेवीच्या देवळात गेलो. तेव्हाही देवीचे दर्शन घेतांना पद्मनाभ उठला आणि नंतर तो पुन्हा झोपी गेला.
१ ई. पद्मनाभ पुष्कळ स्थिर होऊन आणि एकाग्रतेने पहातो. तेव्हा त्याच्या डोळ्यांकडे पहातांना शांत वाटते. एकदा सद्गुरु पिंगळेकाकांना ‘व्हिडिओ’ प्रणालीद्वारे दूरभाष केल्यावर ते म्हणाले, ‘‘याची दृष्टी शून्यात आहे.’’
१ उ. ‘ॐ’ म्हणण्याचा प्रयत्न करणे : तो एक – दीड मासाचा असतांना आई त्याला ‘ॐ’ म्हणण्यास सांगायची. तेव्हा तो ‘आई कसे म्हणते ?’, ते एकाग्रतेने पाहून तसे म्हणण्याचा प्रयत्न करायचा.
१ ऊ. साधिकेच्या वडिलांचे अकस्मात् निधन होणे आणि त्या वेळी पद्मनाभ परिस्थिती समजल्याप्रमाणे शांत असणे : पद्मनाभ ३ मासांचा असतांना माझ्या बाबांचे अकस्मात् निधन झाले. त्या वेळी माझ्या मनाची स्थिती बरी नव्हती. पहिले २ – ३ दिवस माझे लक्ष लागत नव्हते. तेव्हा त्याने मला पुष्कळ समजून घेतले. तो शांत असायचा. जणू ‘त्याला सर्व परिस्थिती किंवा माझ्या मनाची स्थिती लक्षात येत आहे’, असे जाणवायचे. त्या वेळी तो केवळ माझ्याकडे बघत असे.
१ ए. जयघोष केल्यावर औषध घेणे : पद्मनाभ ३ – ४ मासांचा असतांना त्याला औषध घ्यायला आवडायचे नाही; पण एकदा त्याला विविध जयघोष करून औषध दिल्यावर त्याने ते लगेच घेतले अन् पुढेही त्याने कधी औषध घेतांना त्रास दिला नाही.
१ ऐ. विविध मुद्रा करणे : पद्मनाभ विविध प्रकारच्या मुद्रा करतो, तसेच तो न्यासही करतो. त्याच्या पोटात दुखत असले की, तो त्याच्या पोटावर न्यास करतो.
१ ओ. पद्मनाभविषयी आलेल्या अनुभूती
१. एकदा माझ्या सासूबाई बाळाला न्हाऊ घालत असतांना त्यांचा आपोआप वैखरीतून शिवाचा जप होऊ लागला. तेव्हा तो ३ मासांचा होता.
२. एकदा त्याला मर्दन करणार्या ताईंचाही वैखरीतून शिवाचा जप आपोआप होऊ लागला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘एरव्ही मी साईबाबांचा किंवा दत्ताचा जप करते; पण आज माझा शिवाचा नामजप झाला.’’
३. पद्मनाभला झोका देत असतांना माझा नामजप आपोआप व्हायचा.
२. वय ४ ते ६ मास
२ अ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
१. पद्मनाभ ४ मासांचा असतांना परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव साजरा होणार होता. त्याच्या २ दिवस आधीपासून पद्मनाभ पुष्कळ आनंदी असायचा. तो मोठ्याने आवाज करायचा आणि उत्स्फूर्तपणे हसायचा. तेव्हा ‘त्याला गुरुदेवांच्या होणार्या सोहळ्याचा आनंद होत आहे’, असे मला जाणवले.
२. तो ५ मासांचा असतांना मी त्याला श्रीकृष्णाच्या चित्राजवळ नेले आणि त्याला विचारले, ‘‘श्रीकृष्णाचे मोरपीस कुठे आहे ?’’ तेव्हा त्याने अगदी अचूकपणे बोट दाखवले. नंतर मी त्याला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र आणि शेला यांविषयी विचारले. तेही त्याने बोटाने अचूकपणे दाखवले. खरेतर ‘त्याला हे शिकवायचे’, असा माझा विचार होता; परंतु ‘त्याला ते आधीच ज्ञात आहे’, असे मला जाणवले.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेली ओढ
१. परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी उठल्यावर मी त्याला घरातील त्यांच्या सर्व छायाचित्रांजवळ नेले. त्या वेळी त्याने पहिल्यांदा हात पुढे केला आणि त्यांच्या प्रत्येक छायाचित्रातील चरणांना स्पर्श केला. त्याचा एखाद्या गोष्टीला हात लावून त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न त्याच दिवसापासून चालू झाला.
२. त्याला परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे नेल्यावर तो त्याच्या भाषेत त्यांच्याशी बोलायचा. तो त्यांच्या तोंडवळ्यावरून हात फिरवायचा.
३. तो परात्पर गुरुदेवांच्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे आकर्षित व्हायचा.
३. वय ७ ते ९ मास
३ अ. सात्त्विकतेची ओढ
१. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ ही घोषणा दिल्यावर तो उत्स्फूर्तपणे त्याचा हात वर करतो.
२. पद्मनाभला संगीत आणि गाणे यांची आवड आहे. झोपतांना त्याला श्रीरामाचा पाळणा आणि प.पू. बाबांची भजने म्हटलेले आवडते.
३. त्याला ‘नादातूनी या नाद निर्मितो…’ हे श्रीरामाचे भजन आवडते. ते लावल्यावर तो हातवारे करून नाचतो.
४. पद्मनाभला दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ यांचे विशेष आकर्षण वाटते. ते मिळवण्यासाठी त्याची धडपड चालू असते.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेली ओढ
१. तो ७ – ८ मासांचा असतांना त्याला त्याच्या हृदयाकडे हात लावून ‘इथे परम पूज्य आहेत’, असे मी सांगायचे. तेव्हापासून तो त्याच्या छातीला हात लावून ‘परम पूज्य इथे आहेत’, असे दाखवतो. तो त्याचा शर्ट वर करून हे दाखवतो. तेव्हा मला हनुमंताची आठवण होते.
२. पद्मनाभला परात्पर गुरुदेवांना नमस्कार करायला सांगितल्यावर तो लगेच नमस्कार करतो. अगदी मध्यरात्रीही त्याला नमस्कार करायला सांगितले, तरी तो त्यांच्या छायाचित्राकडे पाहून नमस्कार करतो.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा भ्रमणभाष यांमधील परात्पर गुरुदेवांंचे छायाचित्र पाहून त्याला पुष्कळ आनंद होतो.
४. त्याला गुरुदेवांची आरती पुष्कळ आवडते. झोपतांना गुरुदेवांची आरती म्हटली, तर त्याला झोप येत असली, तरी तो झोपत नाही. आरतीचे शेवटचे कडवे पूर्ण झाल्यावरच तो झोपतो.
५. एरव्ही त्याचे खेळण्याकडे लक्ष असते; परंतु गुरुदेवांविषयी काही सांगितल्यास किंवा छोटे भावप्रयोग केल्यास तो ते शांतपणे ऐकतो.
३ ई. पद्मनाभच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कृती
१. पद्मनाभ ७ – ८ मासांचा असतांना ‘ॐ’ म्हणू लागला. त्याने ‘ॐ’ म्हणण्यापासूनच बोलण्यास आरंभ केला. तो खेळता खेळता मधे मधे ‘ॐ’चे उच्चारण करतो.
२. पद्मनाभ प्रतिदिन पहाटे लवकर उठतो आणि उठल्यावर आधी गुरुदेवांना नमस्कार करतो. ‘सूर्यदेवतेला नमस्कार कर’, असे म्हटल्यावर खिडकीकडे पाहून नमस्कार करतो. त्यानंतर ‘कराग्रे वसते लक्ष्मी..’ आणि ‘समुद्र वसने देवी…’ हे २ श्लोक होईपर्यंत नमस्कार करतो आणि गुरुदेवांना प्रार्थना करून झाल्यावर खेळतो.
३. त्याचे बाबा बाहेरून आल्यावर आणि घरी काम करणार्या काकू आल्यावर त्यांना तो स्वतःहून नमस्कार करतो.
४. पद्मनाभ दिवसभरातून मधे मधे स्वतःहूनच आवरण काढतो.
४. वय १० ते १२ मास
४ अ. हसतमुख आणि आनंदी : तो पुष्कळ हसतमुख आहे. तो सतत आनंदी आणि उत्साही असतो.
४ आ. सहनशील : त्याला लस टोचून आणल्यावरही तो कधी फारसा रडायचा नाही.
४ इ. उत्तम स्मरणशक्ती : पद्मनाभला कुठलीही गोष्ट एकदा शिकवली की, ती त्याच्या लक्षात रहाते. त्याला एकदाच ‘आरती कशी करायची ? आवरण कसे काढायचे ? उदबत्ती कशी ओवाळायची ? नमस्कार कसा करायचा ?’, हे शिकवले होतेे. त्याला परत त्याविषयी विचारले, तर तो लगेच तशी कृती करून दाखवतो.
४ ई. पद्मनाभविषयी आलेल्या अनुभूती !
१. पद्मनाभ जेवू लागला. तेव्हापासून त्याचा महाप्रसाद बनवतांना मला त्यात ‘ॐ’चे दर्शन होते.
२. पद्मनाभच्या समवेत असतांना मला आपोआप गुरुदेवांचे स्मरण होते.
३. तो १ मासाचा असल्यापासूनच मला त्याच्या अवतीभोवती हवेत पिवळ्या, निळ्या आणि पांढर्या रंगाचे दैवी कण चमकतांना दिसायचे; पण ते केवळ क्षणभर दिसायचे.’
– सौ. अश्विनी कार्तिक साळुंके, फोंडा, गोवा. (४.१०.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |