सातारा येथील काही जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !
५.७.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफीत पाहून सातारा येथील काही जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘गुरुदेव सारणी लिखाणाला महत्त्व देत आहेत’, हे लक्षात आले आणि त्याचे गांभीर्य समजले.’ – जयश्री वाघ, सातारा
२. ‘मला प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन आवडले. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. मन पुष्कळ हलके झाले. मला समाधान वाटत आहे.’ – सौ. संगीता भोसले (प्राध्यापिका), सातारा
३. ‘मी ‘इस्कॉन’ संप्रदायानुसार साधना करते. मला गुरुदेवांच्या ठिकाणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले.’ – सौ. शांता चव्हाण, सातारा
४. ‘मी इंग्रजी भाषेतील प्रवचन ऐकले. तेव्हा ‘गुरुदेव हे भगवंताचे अवतार आहेत’, असे मला वाटत होते. माझी साधनेविषयी सर्व जाणून घेण्याची इच्छा आहे.’ – सौ. मोनिका संतोष डाफळे, सातारा
५. ‘परात्पर गुरुवर्यांनी जन्मोजन्मांतरीचा आत्मोद्धार करण्यासाठी एक सुवर्णसंधी त्यांच्या अमूल्य अशा देववाणीतून उपलब्ध करून दिली आहे’, असे वाटणे
‘परात्पर गुरुवर्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जन्मोजन्मांतरीचा आत्मोद्धार करण्यासाठी एक सुवर्णसंधी त्यांच्या अमूल्य अशा देववाणीतून उपलब्ध करून दिली आहे’, असे मला वाटले. साधनेचे महत्त्व केवळ ‘ऐकणे किंवा वाचणे’ एवढेच नसून ‘ईश्वराच्या प्राप्तीसाठी भावजागृतीचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे’, अशी अनुभूती मला आली. मला प.पू. गुरुदेवांचा अनुग्रह घ्यायचा आहे.’ – सौ. वैशाली सतीश सुतार (वाचक), क्षेत्र माहुली, सातारा.
६. परात्पर गुरु डॉक्टर कुठल्याही प्रश्नांची उत्तरे हसत आणि सहजतेने देत असणे अन् तेव्हा वातावरणात सर्वत्र चैतन्य आणि आनंद जाणवणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अत्यंत सोप्या शब्दांत साधकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. साधकांचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न असला, तरी परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हसत आणि सहजतेने देत होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या तोंडवळ्यावर प्रेम, उत्साह आणि चैतन्य दिसत होते. कार्यक्रम पहातांना ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासमोरच बसले आहेत आणि मला मार्गदर्शन करत आहेत’, असे मला वाटत होते.’ – श्री. गणेश कार्वेकर (फामार्र्सिस्ट), कराड
७. ‘गुरुदेवांचे बोलणे थांबू नये’, असे वाटणे आणि हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे !
‘प्रत्यक्षात प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळाले. गुरुदेवांचे बोलणे थांबू नये, ते सतत ऐकावे’, असेच मला वाटत होते. त्यांच्या बोलण्यांतून ‘त्यांना न सांगताही माझ्या मनातील प्रश्न समजले’, असे मला वाटले आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून मला माझ्या प्रश्नांची उत्तरेही मिळाली. हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे; कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मला प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाले. माझी मुलगी कु. काव्या (वय ७ वर्षे) हिला प.पू. गुरुदेवांना भेटण्याची फार इच्छा होती. तिची ती इच्छाही पूर्ण झाली. त्यामुळे तिला फार आनंद झाला. कार्यक्रम चालू असतांना तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना १० वेळा नमस्कार केला आणि प्रत्येक वेळी ती मलाही त्यांना नमस्कार करायला सांगत होती.’ – सौ. स्वाती शिंदे, कासुर्डी
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे पाहिल्यावर फार तेज जाणवते !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितलेला ‘आश्रमात राहिल्यावर होणारा पालट’ हा भाग चांगला वाटला. ‘आश्रमात राहिल्यावर पालट होणारच’, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे पाहिल्यावर फार तेज जाणवते आणि ‘काहीतरी अद्भुत शक्ती आहे’, असे जाणवते.’- पालकर, सातारा
९. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रत्येक शब्द कानात साठवावा’, असे मार्गदर्शन असणे
‘साधना करतांना होणार्या चुका आणि साधनेचा मार्ग कसा हवा ?’, यांविषयी पुष्कळच चांगले मार्गदर्शन लाभले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रत्येक शब्द कानात साठवावा’, असे मार्गदर्शन होते. माझ्या मनातील पुष्कळ प्रश्नांची उत्तरे मिळाली.’ – सौ. दीपाली नेशीज्ञरी (हितचिंतक), सातारा
१०. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चालू असतांना ‘गुरुदेव घरी येत आहेत’, असा विचार करून प्रार्थना केल्यावर एक छोटा नाग घरात येणे
‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात गुरुदेव शंकानिरसन करत असतांना मी डोळे बंद करून ‘प.पू. गुरुदेव आपल्या घरी येत आहेत’, असा विचार करून प्रार्थना करत होते. मी डोळे उघडल्यावर मला एक छोटा नाग घरामध्ये येतांना दिसला. तो नाग घरात येऊन पुन्हा बाहेर गेला. आमचा कुत्रा दारात असूनही ‘तो नाग घरात कसा आला ?’ याचे मला आश्चर्य वाटले. नंतर ‘त्या नागाच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच घरी येऊन गेले’, असे मला जाणवले.’ – सौ. राधिका वेटोळे, सातारा
११. ‘गुरुकृपेला पात्र होण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने कसे प्रयत्न करायचे ?’, हे परात्पर गुरुदेवांनी चांगल्या प्रकारे समजावले.’ – सौ कल्पना सांगळे, ‘सनातन प्रभातच्या’ वाचिका, सातारा.
१२. ‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात परम पूज्यांचे स्वभावदोषांविषयीचे मार्गदर्शन ऐकल्यावर माझी भावजागृती झाली.’ – सौ. अनुराधा कागदे, बांदल वस्ती, सातारा.
१३. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन ऐकल्यावर सेवेची तळमळ वाढणे
‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन ऐकल्यावर ‘सेवेला केव्हा बाहेर पडू ?’, असे होत आहे. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सेवा करावी’, असे मला वाटत आहे.’ – सौ. अनुराधा कागदे, बांदल वस्ती, सातारा.
१४. गुरुदेवांना पाहिल्यावर ‘ते साक्षात् श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे वाटणे
‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्याविना साधनेत प्रगती होत नाही’, हे मला गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून शिकायला मिळाले. ‘ही प्रक्रिया आपण चालू केली पाहिजे’, असे वाटले. गुरुदेवांना पाहिल्यावर ‘ते साक्षात् श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे वाटते. – श्री. राजेश तांबोळी, सातारा.
१५.‘परात्पर गुरुदेवांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा घरबसल्या लाभ होणे आणि नामजप करून संतपद कसे गाठता येते ?’, हे समजणे
‘परात्पर गुरुदेवांनी जे अमूल्य मार्गदर्शन केले, त्याचा आम्हाला घरबसल्या लाभ घेता आला. आम्हाला नामजपाचे महत्त्व कळले. ‘आपल्या चुका शोधून त्या कशा प्रकारे दूर करता येतात ? आणि नामजप करून संतपद कसे गाठता येते ?’, यांविषयी मार्गदर्शन मिळाले.’ – सौ. मनीषा विनायक शितोळे, सातारा
१६. ‘गुरुपौर्णिमेचा सोहळा चालू असतांना परात्पर गुरूंशी घरात बसून बोलत आहे’, असे मला जाणवले. घरातील वातावरण अधिक उत्साही वाटत होते.’ – मंगल पोटे, सातारा
१७. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे येणार्या आपत्काळाला कसे सामोरे जायचे ?’, याचे मार्गदर्शन मिळणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेत प्रगती करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ‘येणार्या आपत्काळाला कसे सामोरे जायचे ?’, याचेही मार्गदर्शन मिळाले. ‘आमचीही साधनेत प्रगती व्हावी’, ही ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद !’ – सौ. सुवर्णा लक्ष्मण शिंदे, सातारा
१८. ‘परात्पर गुरुदेवांनी दिलेली माहिती मनापासून ऐकली. ‘आपत्काळात काळजी कशी घ्यावी ?’, ते समजले. आम्हा सर्वांना गुरुतत्त्वाचा लाभ झाला.’ – सौ. अर्चना तुषार कोळी, सातारा
१९. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन पुष्कळ आवडले आणि कालचक्राची माहिती मिळाली. आमच्यासाठी नंतर सत्संग घेऊ शकता.’ – सौ. रेश्मा निकम, सातारा
ध्वनीचित्रफीत पाहून जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !‘गुरु-शिष्य परंपरा’ हीच भारताची खरी ओळख; मात्र या वर्षी दळणवळण बंदीमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना ५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे प्रत्यक्ष सोहळ्यांचे आयोजन करता आले नाही. असे जरी असले, तरी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांना जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या वर्षी प्रथमच गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाचे चित्रीकरण दाखवण्यात आले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे समोर बसून आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. आमच्या अनेक शंकांचे निरसन झाले. साधकांनी विचारलेले प्रश्न आम्हालाही पडले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या मौलिक मार्गदर्शनातून आमच्याही प्रश्नांची उत्तरे मिळाली’, असे अनेक जिज्ञासूंनी सांगितले. अनेकांना आध्यात्मिक स्तरावरील अनुभूतीही आल्या. यातील काही निवडक अभिप्राय पुढे देत आहोत. १. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकून ‘स्वभावदोषांमुळे मनाची एकाग्रता साधता येत नाही’, हे समजणे‘मी ध्यानधारणा करते; पण ‘ध्यानाच्या वेळेस अर्धा ते एक घंटा मी वेगवेगळ्या विचारांत कधी वहावत जाते’, ते मला कळतही नाही. परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकून मला ‘स्वभावदोषांमुळे मनाची एकाग्रता साधता येत नाही’, हे समजले. मला हा विषय अतिशय आवडला. आजपर्यंत मी स्वतःतील स्वभावदोषांकडे कधीच लक्ष दिले नाही. आजपर्यंत आम्हाला ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय कुणी सांगितलाच नाही.’ – सौ. शामला सुरेश गलंगे, कोपरखैरणे, नवी मुंबई. २. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी केलेले आध्यात्मिक शंकांचे निरसन आम्हाला भावी जीवनासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी फारच उपयोगी आहे.’ – सौ. साधना प्रसाद रिसबूड, पनवेल, जिल्हा रायगड. (२८.७.२०२०) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |