(म्हणे) ‘भाजपवाले श्रीराममंदिराच्या देणग्या गोळा करून त्या पैशांतून रात्री मद्यपान करतात !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप
तोंड आहे म्हणून बरळणारे काँग्रेसचे आमदार ! देशात सर्वाधिक काळ सत्तेत असणार्या काँग्रेसवाल्यांनी देशाच्या विकासाचा किती निधी हडपला, हे जगाला ठाऊक आहे !
झाबुआ (मध्यप्रदेश) – भाजपच्या नेत्यांनी श्रीराममंदिराच्या नावाखाली गेली अनेक वर्षे सहस्रो कोटी रुपये जमा केले आहेत, त्याचे काय झाले ? भाजपवाले श्रीराममंदिराच्या नावाखाली देणग्या गोळा करतात आणि त्याच पैशांचा वापर करून रात्री मद्यपान करतात, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार आणि माजी केंद्रीयमंत्री कांतिलाल भूरिया यांनी केला आहे.
Congress MLA Kantilal Bhuria accuses BJP leaders of misappropriating funds for Ram Mandir construction. Says ‘BJP leaders collected thousands of crores over the years in the name of Ram Temple. They collect donations in the day & drink alcohol using the same money at night’ pic.twitter.com/zFCfGTWXmA
— NEWS9 (@NEWS9TWEETS) February 2, 2021
भूरिया यांनी क्षमा मागावी ! – भाजप
यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष कलसिंह भाबर यांनी म्हणाले की, श्रीराममंदिराचे काम चालू झाल्याचे काँग्रेसला पहावत नाही. काँग्रेसवाले आता काहीही बरळायला लागले आहेत. भूरिया यांनी त्यांच्या विधानासाठी क्षमा मागावी.
मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा म्हणाले की, श्रीराममंदिरासाठी जमा केल्या जाणार्या देणग्या थेट बँक खात्यात भरल्या जातात. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ यांचे बँक खाते आहे, तेथेच हा सर्व निधी जमा केला जातो.