गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !
‘गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करत गुरुकृपेने प्रारब्धातील अपमृत्यूवर मात करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !
३० जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दिवशी दिवशी श्री. देवांग गडोया यांच्या आजारपणात त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी आपण पाहिले. आज त्यातील पुढचा भाग पाहूया.
भाग ३
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/446697.html
भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/447158.html
५ उ. काळजीपोटी वडील आणि भाऊ यांनी पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला येण्याचा आग्रह धरणे : माझे वडील आणि मोठा भाऊ यांना माझ्या आजारपणाविषयी काळजी वाटत होती. माझे शरीर पिवळसर झाल्याचे मला पहायला आलेली माझी बहीण, वहिनी आणि सौ. रिशिता यांच्या लक्षात आले होते. आधुनिक वैद्यांना सांगितल्यावर ‘हेे सामान्य आहे’, असे म्हणत ते त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यानंतर वडील आणि भाऊ यांच्या आग्रहास्तव आम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आणि आधुनिक वैद्य सामंत यांच्या सल्ल्याने घेतला.
६. मुंबईत केलेले उपचार
६ अ. आम्ही मुंबईला आल्यावर दुसर्या दिवशी भावाच्या ओळखीच्या तज्ञ आधुनिक वैद्या मला पहाण्यासाठी आल्या. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही आजारी आहात’, असे वाटत नाही. तुम्हाला रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी राहूनही बरे होऊ शकता.’’ तेव्हा ‘मला पुन्हा रुग्णालयात जायला लागू नये, याची काळजी परात्पर गुरु डॉक्टरांनीच घेतली आहे’, असे मला वाटले.
६ आ. यकृत पूर्ववत् झाले, तरी कावीळ बरी न झाल्यामुळे झोपून रहावे लागणे, भेटायला आलेल्या कुटुंबियांनी ‘तुम्हाला एवढे सर्व सोसावे लागले, हे तुमच्याकडे पाहून वाटत नाही’, असे म्हणणे; तेव्हा ‘गुरूंची कृपा आणि साधना नसती, तर हे सर्व जण मला पहाण्यासाठी नाही, तर माझ्या अंत्यसंस्काराला आले असते’, असे वाटणे : थोड्या दिवसांनंतर माझे यकृत पूर्ववत् झाले आणि माझ्या पोटाचा आकारही न्यून झाला होता; मात्र माझी कावीळ अद्याप बरी झाली नसल्यामुळे मला बसता येत नव्हते. दिवसभर मला झोपून रहावे लागत असे. माझ्या आजारपणाविषयी समजल्यामुळे कुटुंबातील इतर अनेक व्यक्ती मला भेटायला येत होत्या. मला पाहून त्या म्हणत असत, ‘‘तुम्ही बर्यापैकी चांगले दिसता. तुम्हाला एवढे सर्व सोसावे लागले, हे तुमच्याकडे पाहून वाटत नाही.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘गुरूंची कृपा आणि साधना नसती, तर हे कुटुंबीय मला बरे होतांना पहाण्यासाठी नाही, तर माझ्या अंत्यसंस्काराला आले असते.’
‘कावीळ नियंत्रणात आली, तरी यकृतासाठी औषधोपचार आणि पथ्य चालू ठेवावे लागणार’, असे तेथील आधुनिक वैद्यांनी मला सांगितले.
६ इ. त्यानंतर मूळव्याधीचा त्रास होऊ लागणे आणि आतापर्यंत रोखून धरलेला सहनशीलतेचा बांध फुटून ‘असे का घडत आहे ?’, असा प्रश्न पडणे; मात्र त्या वेळी ‘आजारांच्या माध्यमातून प्रारब्धाचा एक मोठा भाग संपुष्टात येणार आहे’, असे आतून उत्तर मिळणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही तसेच सांगणे : इतक्या दिवसांच्या औषधोपचारांमुळे माझ्या शरिरातील उष्णता वाढून मला मूळव्याधीचा त्रास होऊ लागला. या त्रासामुळे मी आतापर्यंत रोखून धरलेला सहनशीलतेचा बांध फुटला. माझे मन अस्थिर झाले. ‘असे का घडत आहे ?’, असा प्रश्न प्रथमच मला पडला; मात्र मला त्या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे मिळाले, ‘या आजारांच्या माध्यमातून माझा प्रारब्धाचा एक मोठा भाग संपुष्टात येणार आहे.’
याच कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझी चौकशी करण्यासाठी मला मधे मधे भ्रमणभाष करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या आध्यात्मिक स्तरावरच बोलत होत्या. ‘तुम्हा दोघांच्या प्रारब्धाचा एक मोठा भाग नष्ट होत आहे’, असे त्या म्हणाल्या. ते ऐकून मला वाटले, ‘रुग्णाईत असतांनाही मी स्थिर आणि आध्यात्मिक स्तरावर रहावे’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांची इच्छा आहे.’
७. देवद (पनवेल) येथील आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराजांनी केलेल्या उपायांमुळे पूर्णपणे बरा झाल्याचे वाटणे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रती वाटणारी कृतज्ञता शब्दांत मांडू शकत नसल्याने त्यांना साष्टांग नमस्कार करणे
मी वैद्यकीय उपचारांसाठी काही दिवस मुंबईत राहिलो. त्या कालावधीत परात्पर गुरु पांडे महाराज नियमितपणे भ्रमणभाष करून माझी चौकशी करत होते. काही दिवसांनंतर आम्ही उभयतां अनुमती घेऊन देवद (पनवेल) येथील आश्रमात गेलो. तेथे गेल्यावर आम्ही परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडे गेलो. ते मला म्हणाले, ‘‘माझ्याजवळ बसा. मी तुमच्यावर उपाय करतो. त्यानंतर तुम्हाला कसे वाटते, ते पाहूया.’’ परात्पर गुरु पांडे महाराजांनी काही मिनिटे मंत्रजप केला आणि नंतर माझ्यावर तीर्थ शिंपडले. त्या क्षणी मला वाटले, ‘मी पूर्णपणे बरा झालो आहे.’ परात्पर गुरु पांडे महाराजांनी त्याचे श्रेयही (कर्तेपण) स्वतःकडे घेतले नाही. त्या वेळी मला त्यांच्याप्रती वाटणारी कृतज्ञता मी शब्दांत व्यक्त करू शकत नसल्याने मी केवळ त्यांना साष्टांग नमस्कार केला.
‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासाठी किती करत आहेत ?’, या विचाराने माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
८. गोव्यात आल्यावर संतांनी ‘तुमच्या प्रारब्धात अपमृत्यू होता. देवाने तुम्हाला त्यातून बाहेर काढले’, असे सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अपार कृतज्ञता व्यक्त होणे
आम्ही गोव्यात परत आल्यानंतर संतांनी आम्हाला विचारले, ‘‘या परिस्थितीत तुम्ही दोघेही इतके शांत कसे काय राहिलात ?’’ त्या वेळी रिशिता त्यांना म्हणाली, ‘‘सर्वांत वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मला सिद्धता करायला हवी, उदा. ‘आता देवांग यांना शक्य नाही, तर मला अनेक गोष्टी शिकून घ्यायला हव्यात’, असे विचार माझ्या मनात येत होते.’’
त्यांनी मला विचारल्यावर मी म्हणालो, ‘‘माझ्या मनात एवढेच होते, ‘माझे शरीर प्रारब्धभोग भोगत असून मन अलिप्त आहे’ आणि त्यामुळे मी शांत होतो.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुमच्या प्रारब्धात अपमृत्यू होता. देवाने तुम्हाला त्यातून बाहेर काढले. देवाने तुमच्यात काहीतरी पाहिले असणार, त्यामुळे त्याने तुम्हाला वाचवले.’’ हे ऐकल्यावर ‘देवाने माझ्यात काहीतरी पाहिले असल्यामुळे त्याने माझे रक्षण केले’, या विचाराने मला आणखी कृतज्ञता वाटली.
मला जीवनदान दिल्याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘माझे हे जीवन आश्रम आणि साधक यांच्यासाठी अन् ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’ या परात्पर गुरु डॉक्टरांच्या ध्येयपूर्तीसाठी समर्पित होऊ दे’, हीच त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’ (समाप्त)
– श्री. देवांग गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |